व्याघ्रदिन कार्यक्रम
By Admin | Updated: August 1, 2016 00:18 IST2016-08-01T00:18:56+5:302016-08-01T00:18:56+5:30
कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कार्यक्रम पार पडला.

व्याघ्रदिन कार्यक्रम
मुखवटा स्पर्धा : अनेक विद्यार्थी बनले वाघ
साकोली : कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कार्यक्रम पार पडला.
संस्था सचिव विद्या कटकवार, प्राचार्य प्रकाश मस्के, प्रा.यु.टी. गायधने यांचे उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने, निसर्गमित्र शुभम बघेल, बाळकृष्ण मेश्राम व गुणवंत जिभकाटे यांनी व्याघ्र दिनानिमित्त सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्याघ्र दिनानिमित्त वाघ चेहरा रंगवा, वाघ मुखवटा बनवा, वाघ संदेश लिहा स्पर्धा विद्यालयात घेण्यात आल्या. स्पर्धेचे परीक्षण पुष्पा बोरकर, मनिषा कशीकर, प्रा.के.पी. बिसेन, शुभम बघेल, गुणवंत जिभकाटे तसेच बाळकृष्ण मेश्राम यांनी केले.
वाघ चेहरा रंगवा स्पर्धेत मिडलस्कुल गटात रितीक शौरी, आयुष खोब्रागडे यांना प्रथम तर आर्यन टेंभुर्णे, जयंत मेश्राम, प्रणाली लांडेकर, भावना तिलकराज यांना द्वितीय व यामीनी भेंडारकर, लिना शिवनकर यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक हिमांशू कटरे, यश क्षीरसागर, दिनेश कुरंजेकर, सुरेश कापगते, भाग्यश्री कांबळे, तृप्तीका कठाणे यांना प्राप्त झाला. हायस्कुल गटात दिपांशु पोकळे, युवराज बोबडे, शानिद पठाण, अनिकेत नागोसे यांना प्रथम क्रमांक तर निहांस थानथराटे, सिद्धांत दुबे, महेश गिऱ्हेपुंजे, चैतन्य कटरे यांना द्वितीय क्रमांक तर परिचित खोटेले, प्रतिक कापगते, मिहीर कान्हेकर, ओम बैस, सजल रोकडे, सुमित तिडके यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
प्रोत्साहनपर क्रमांक क्रिश गहाणे, हर्षद गहाणे, सुभाष शहीर, शौशित परमार यांना प्राप्त झाला. ज्युनिअर कॉलेज गटात मोहिनी खडसिंगे, पुनम चांदेवार हिला प्रथम तर प्रणाली लांडेकर ला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. वाघ मुखवटा बनवा स्पर्धेत इंग्लीश स्कुल गटात चैतन्य रहांगडालेला प्रथम तर सेजल भेंडारकरला द्वितीय, शहजाद शेख व शिवानी चौधरीला तृतीय क्रमांक प याप्त झाला. मिडलस्कुल गटात प्रदीप क्षीरसागरला प्रथम तर दिव्यास गजापुरे, पियुष पोटेफोडे व रितीक शौरी ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. हायस्कुल गटात सजल रोकडेला प्रथम तर सम्यक साखरेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. प्रफुल साखरे, कुणाल आरसोडे, युवराज बोबडे, भाग्यश्री कांबळे, कृतीका कठाणे, सतीश नकरे, मोम्मटु कोते, जय रहांगडाले, हर्षा लांडेकर, चैतन्य कटरे, शुभम शहारे, समीर भेंडारकर यांना प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला.
वाघ चित्र संदेश बनवा स्पर्धेत चैतन्य रहांगडाले प्रथम, शिवानी चौधरीला द्वितीय क्रमांक, ज्युनिअर गटात प्रणाली लांडेकरला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. अश्विन कुंभरेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. हायस्कुल गटात नेहा बडोले ला प्रथम तर काजल वाघमारेला द्वितीय क्रमांक व अस्मिता रामटेके ला तृतीय क्रमांक व दिपांशू पोवळेला प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला. संचालन व आभार बी.एस. लंजे, प्रा.शीतल शाहू यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)