तिबेटीयन दुचाकी रॅली भंडाऱ्यात दाखल
By Admin | Updated: October 11, 2016 00:32 IST2016-10-11T00:32:51+5:302016-10-11T00:32:51+5:30
भारत सरकारने चीनशी सकारात्मक बोलणी करावी या उद्देशाने कर्नाटकातील बेलकुप्पी या तिबेटी निर्वासीत ...

तिबेटीयन दुचाकी रॅली भंडाऱ्यात दाखल
जल्लोशात स्वागत : बाईकस्वार करणार ३२ हजार किमीचा प्रवास
भंडारा : भारत सरकारने चीनशी सकारात्मक बोलणी करावी या उद्देशाने कर्नाटकातील बेलकुप्पी या तिबेटी निर्वासीत वसाहतीतील युवकांनी बाईक रॅलीतून जनजागृती सुरु केली आहे. हे बाईकस्वार युवक भंडारा शहरात दाखल झाले. त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
चीनने तिबेटला पुर्ण स्वातंत्र देण्याऐवजी स्वायत्ता देण्याकरिता मध्यम मार्गाचा अवलंब करुन दलाईलामा व निर्वासीत तिबेट सरकारच्या प्रतिनिधीशी चर्चा करावी. युनोने चीनद्वारा तिबेटमध्ये गंभीररित्या सुरु केलेल्या मानवाधिकाराचे हणन, पर्यावरणाचा विनाश व सर्व राजकीय कैद्यांची सुटका करावी म्हणून चीनला समज द्यावी तसेच चीनच्या माध्यमातून तिबेटीयन नागरिकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात १४४ तिबेटीयन लोकांनी केलेल्या आत्मदहनाची दखल घेवून भारतीय नागरिकांनी भारत सरकारवर दबाव आणावा व भारत सरकारनी चीनशी सकारात्मक बोलणी करावी या उद्देशाने ही बाईक रॅली काढण्यात येत आहे.
२ आॅक्टोंबरपासून सुरुवात झालेले ही बाईकरॅली ३२ हजार किलोमिटरचा टप्पा पुर्ण करीत १२ आॅक्टोंबरला हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे पोहचणार आहे. या मोटारबाईक रॅलीचे भंडारा शहरातील त्रिमुर्ती चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आगमन झाले. यावेळी भारत- तिबेट मैत्रीसंघातर्फे राज्य महासचिव अमृत बन्सोड, डी. एफ. कोचे, गुलशन गजभिये, असित बागडे, रुपचंद रामटेके, संजय बन्सोड, महादेव मेश्राम, एम. डब्ल्यू. दहिवले यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर वैशाली नगरातील बुध्द विहारात आयोजित समारंभात संस्थेचे अध्यक्ष महादेव मेश्राम, एम. डब्ल्यू दहिवले, वामन मेश्राम, ज्ञानेश्वर गजभिये, सुरेंद्र सुखदेवे, शकुंतला हुमणे, शकुंतला गजभिये, विशाखा वाहाणे आदींनी बाईकरॅलीतील युवकांचे स्वागत करुन पुढल्या प्रवेशाला शुभेच्छा दिल्या. मोटारबाईक रॅलीत कुनसांगदोरजी, नामगॅल डोलो, त्सीरीन झोनजन, त्येजिनत्सोनज्यू, तेजन त्सीरींग, सोनम, सोनम धांडूप यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन अमृत बन्सोड यांनी केले तर आभार एम. डब्ल्यू. दहिवले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)