पुलावर ‘बर्निंग व्हॅन’चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:25 IST2017-07-20T00:25:36+5:302017-07-20T00:25:36+5:30

वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावर सुसाट वेगाने जाणाऱ्या मारोती व्हॅनला अचानक आग लागली.

Throwing of 'Burning Van' on Bridge | पुलावर ‘बर्निंग व्हॅन’चा थरार

पुलावर ‘बर्निंग व्हॅन’चा थरार

चार जण बचावले : महामार्गावरील वाहतूक पाऊण तास ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावर सुसाट वेगाने जाणाऱ्या मारोती व्हॅनला अचानक आग लागली. धावत्या वाहनाने पेट घेतल्याची बाब लक्षात येताच चालकाने वाहन थांबविल्याने वाहनातील चार जण सुदैवाने बचावले. ही घटना सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात उभारलेल्या पुलावर धावत्या वाहनाने पेट घेतल्याची माहिती होताच जिल्हा पोलीस प्रशासनाने याची दखल घेत महामार्गावरील वाहतूक अर्धा कि.मी. आधीच थांबविली. तसेच अग्नीशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आली. मारोती व्हॅन टायरसह जळून खाक झाल्याने वाहनाचे नंबर मिळू शकले नाही. तसेच वाहनातील चारही जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ पाठविल्याची प्राथमिक माहिती आहे. महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापर्यंत प्रभावित झाली होती. सदर जळालेल्या वाहनात सिलिंडरचा उपयोग करण्यात आला असावा असा कयासही यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान वाहनाला आग कशामुळे लागली याची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Web Title: Throwing of 'Burning Van' on Bridge