कार-दुचाकी अपघातात तीन गंभीर

By Admin | Updated: April 24, 2017 00:53 IST2017-04-24T00:53:17+5:302017-04-24T00:53:17+5:30

भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले.

Three serious in a car-bike accident | कार-दुचाकी अपघातात तीन गंभीर

कार-दुचाकी अपघातात तीन गंभीर

केसलवाडा फाट्यानजिकची घटना : वाहनांचे मोठे नुकसान
लाखनी : भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील केसलवाडा फाट्यानजिक घडली.
अंकोश धनराज निंबार्ते (३०), धनराज सदाशिव निंबार्ते (५५), रा. मंडनगाव व शोभा यादव कुथे (३४) रा. गडेगाव, अशी जखमींची नावे आहेत.
भंडाराहून साकोलीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कार क्र. एम. एच. ३५ पी. ७४६९ ने लाखनीहून गडेगावकडे जात असलेल्या दुचाकी क्र. एम. एच. ३६ पी. १३२२ ला दुभाजक पार करून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, कारने दुचाकीला धडक देऊन विद्युत रोहित्राला जाऊन आदळली. दुचाकीस्वार तीघेही फेकल्या गेले. अपघातात दुचाकीचे व कारचे मोठे नुकसान झाले. लाखनी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता शहारे व कर्मचारी मते यांनी वेळीच प्रसंगावधान राखून त्या परीसरातील विद्युत पुरवठा बंद केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमींना लाखनी ग्रामीण रूग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु लाखनी ग्रामीण रुग्णालयात सोयींच्या अभावामुळे त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. लाखनी पोलीसांनी कार चालक लालचंद पटले (२२) याच्या विरोधात गुन्हा नोंदविला. (तालुका/शहर प्रतिनिधी )

Web Title: Three serious in a car-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.