शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

ज्येष्ठांचे तीन महिन्यांचे मानधन अडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST

कोरोना संकटाने सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. दैनंदिन व्यवहार अडचणीचे झाले. शेतकऱ्यांच्या अनेक घरात निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. शेतकरी अठराविश्वे ...

कोरोना संकटाने सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. दैनंदिन व्यवहार अडचणीचे झाले. शेतकऱ्यांच्या अनेक घरात निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. शेतकरी अठराविश्वे दारिद्र्यात आहेत. संकटकालीन स्थितीत शासनाचे ज्येष्ठांना मिळणारे मानधन लाख मोलाचे ठरत आहे. दरमहा हजार रुपयांचे मानधन औषधीकरिता व कुटुंबाकरिता आधार आहे. परंतु जूनपासून लाभार्थ्यांना मानधन मिळाले नसल्याने वृद्धांची आर्थिक अडचण वाढली आहे. शासनाने दरमहा ज्येष्ठांना आर्थिक सहकार्य करणे काळाची गरज बनली आहे. फार जुनी असलेली योजना अजूनही टिकून आहे. यावरून योजनेचे महत्त्व शासनासह प्रशासनालासुद्धा कळले आहे. गरजू लाभार्थ्यांना या योजनेमुळे हायसे वाटले आहे.

बॉक्स

बापू, बँकेत पैसे आले का गा!

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना शासनाच्यावतीने हजार रुपये दरमहा मानधन पुरविले जाते. हजार रुपयांचे मानधन ज्येष्ठांना अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित मानधन मिळत नसल्याने आर्थिक समस्या येत आहेत. बँकेत जमा झाले का, म्हणून पायऱ्या झिजवण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे. बँकेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दररोज विचारणा वाढलेली आहे. बापू, बँकेत पैसे आले का गा! असे विचारताच नाही जी, म्हणताना काळजात धस्स होत आहे.

कोट

वृद्धापकाळ मानधन योजनेचा दोन महिन्यांचा निधी अगदी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. जून व जुलै महिन्याचे मानधनाचे नियोजन सुरू आहे. प्रतिभा दोनोडे, प्रभारी तहसीलदार, लाखनी

कोट

मायबाप सरकारने प्रत्येक महिन्याला आमचे हजार रुपये दिले तर फारच चांगले होईल. महागाईत हजार रुपयेही पुरत नाहीत. उधारी कुणी देत नाही. दिलीच तर वस्तूंचे दर अधिक घेतात. याच पैशांवर आमचे पोट आहे.

पारबता नेवारे, लाभार्थी, पालांदूर