शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोळा महिन्यांत तीन परवाने रद्द, ६८ औषधी दुकाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:16 IST

अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई : दुकानदारांना हयगय करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : एप्रिल २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अन्न व औषधी प्रशासन विभाग, भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील अनेक औषधी दुकानांची तपासणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्याने तीन औषधी दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच स्टॉक व विक्रीत तफावत तसेच अन्य कारणांसाठी ६८ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. ही कारवाई औषधी निरीक्षकांच्या तपासणीअंती सहायक आयुक्त (औषधी) मोनिका धवड यांनी केली.

औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९४५ अंतर्गत औषध विक्री व साठवणूक यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना मेडिकल स्टोअर्स चालकांना देण्यात आल्या आहेत. परंतु, अनेकदा औषध विक्रेते नियम व कायद्याचे पालन न करता मनमर्जीने औषधांची विक्री करीत असतात. तसेच ग्राहकांना बिल न देणे, स्टॉक बूकवर नोंदी न घेणे, प्रतिजैविक औषधांचे बिल न देणे तसेच अन्य गैरप्रकार करताना दिसून येतात.

यामुळे ग्राहकांचे तसेच शासनाचे नुकसान होत असते. शिवाय डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे विकल्यास त्याचे गंभीर परिणाम रुग्णांना भोगावे लागण्याची शक्यता असते. यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागांच्या निरीक्षकांतर्फे औषध दुकानांचे तपासणी करण्यात येत असते.

या दुकानांचे परवाने झाले रद्द औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना विकणे व अन्य कारणांसाठी मे. कोरे मेडिकल अँड जनरल स्टोअर्स पळसगाव सोनका, मे. अक्षय मेडिकल स्टोअर्स मोहाडी, मे. कुसुम मेडिकल स्टोअर्स कांद्री आदी तीन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले.

४६ दुकानदारांनी स्वतःहून केले परवाने रद्द जिल्ह्यात औषधी दुकानांत मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढीस लागली आहे. त्यातच शहरातील बहुतेक डॉक्टरांनी स्वतःचेच मेडिकल स्टोअर्स उघडले आहेत. त्यामुळे अन्य मेडिकल स्टोअर्स चालनासे झाले आहेत. किराणा व स्वतःची मजुरीही दुकानातून निघत नसल्याने जिल्ह्यातील ४६ औषध विक्रेत्यांनी स्वतःहून दुकानांचे परवाने रद्द करण्याचे पत्र दिले. त्यामुळे त्यांचे परवाने रद्द करण्यात आले.

विक्रेत्यांनी या बाबींची घ्यावी काळजी नोंदणीकृत फार्मासिस्ट दुकानात बसावे व स्वतःच्या देखरेखीत औषधांची विक्री करावी. सेक्स तसेच झोपेच्या गोळ्या व अन्य गंभीर आजारावरील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करू नये. औषधांची विक्री व स्टॉकची माहिती अद्ययावत ठेवावी. व्हेटर्नरी औषधांची साठवणूक लेबलसह करावी.

"औषध विक्रेत्यांनी नियम व कायद्याचे पालन करीत औषधांची विक्री करण्याचे गरजेचे आहे. परंतु, मेडिकल स्टोअर्स चालकांनी हयगय केल्याने तसेच औषधी निरीक्षकांच्या तपासणीत दोषी आढळून आल्याने तिघांचे परवाने रद्द तर ६८ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले."- मेनिका धवड, सहायक आयुक्त (औषधी), भंडारा.

टॅग्स :Medicalवैद्यकीयbhandara-acभंडारा