सिहोरा येथे घराचे कुलूप तोडून तीन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:02+5:302021-07-08T04:24:02+5:30

सुशील योगराज बोकडे (३२) रा.सिहोरा यांच्या लहान भावाचा नागपूर येथे साक्षगंध होता. त्यामुळे सर्व परिवार रविवारी नागपूर येथे गेले. ...

Three lakh stolen by breaking the lock of a house in Sihora | सिहोरा येथे घराचे कुलूप तोडून तीन लाखांची चोरी

सिहोरा येथे घराचे कुलूप तोडून तीन लाखांची चोरी

सुशील योगराज बोकडे (३२) रा.सिहोरा यांच्या लहान भावाचा नागपूर येथे साक्षगंध होता. त्यामुळे सर्व परिवार रविवारी नागपूर येथे गेले. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली. त्यामुळे ते मंगळवारी नागपूरवरून घरी आले. घराची पाहणी केली असता, समोरील दाराचे कुलूप तोडलेले आढळून आले. घरातील अलमारीतील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. अलमारीतील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र किंमत ८० हजार रुपये, दीड तोळे सोन्याचे दुसरे मंगळसूत्र किंमत ६० हजार रुपये, दोन सोन्याचे झुमके किंमत २० हजार रुपये, पाच ग्रॅम वजनाचा सोन्याचा छल्ला किंमत २० हजार रुपये, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे लाॅकेट किंमत २० हजार रुपये आणि एक लाख रुपये रोख, असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती सिहोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, तपास सिहोरा पोलीस करीत आहेत.

Web Title: Three lakh stolen by breaking the lock of a house in Sihora