तीन तासांत अस्वल अडकले पिंजऱ्यात

By Admin | Updated: January 22, 2016 01:44 IST2016-01-22T01:44:12+5:302016-01-22T01:44:12+5:30

वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील विरली खंदार या गावातील पुरुषोत्तम वाघधरे यांच्या घरात अंदाजे दीड वर्षाचे अस्वलाचे पिल्लू शिरले. याची

In three hours the bears get trapped in cages | तीन तासांत अस्वल अडकले पिंजऱ्यात

तीन तासांत अस्वल अडकले पिंजऱ्यात

विशाल रणदिवे ल्ल अड्याळ
वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील विरली खंदार या गावातील पुरुषोत्तम वाघधरे यांच्या घरात अंदाजे दीड वर्षाचे अस्वलाचे पिल्लू शिरले. याची माहिती गावातील सरपंचांनी वन विभागाला सकाळी १० वाजता दिली. वनविभागाचे कर्मचारी व प्राणीमित्रांच्या सहकार्याने तीन तासानंतर अस्वलीच्या पिल्लाला जेरबंद करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
अड्याळहून विरली खंदार हे गाव ४ कि.मी. अंतरावर आहे. गावातील सर्वात शेवटी असणाऱ्या घरात अस्वल शिरले होते. अस्वलीने कुणालाही इजा पोहचविली नाही. गावातील घरात अस्वल आहे कळताच नागरिकांनी गर्दी केली होती. त्या पिल्लाला पिंजऱ्यात पकडण्यासाठी प्राणीमित्र तसेच वनविभाग अधिकारी कर्मचारी व सहकाऱ्यांची दमछाक झाली.
या अस्वलाच्या पिल्लूची आई व दूसरे पिल्लू परिसरात कुठेतरी असणार अशी शक्यता वनविभाग व प्राणीमित्रांनी दर्शवली आहे. अस्वल पिल्ले पिंजऱ्यात घालून गावकऱ्यांना न दाखवताच वनपरिक्षेत्र अड्याळला आणल्यामुळे काही काळ गावकरी व वनविभाग अधिकाऱ्यांत शाब्दीक चकमक झाली.
या पिल्लूला अड्याळ पवनी वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ व प्राणी मित्रांच्या तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलीच्या पिल्लाला पिंजऱ्यात अडकविण्यात यश मिळाले.

Web Title: In three hours the bears get trapped in cages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.