‘त्या’ तिन्ही मुली सापडल्या

By Admin | Updated: August 7, 2015 00:43 IST2015-08-07T00:43:14+5:302015-08-07T00:43:14+5:30

दवाखान्यात जाण्यासाठी वैशाली वसतिगृहातून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींना २४ तासाच्या आता शोधण्यात अड्याळ पोलिसांना यश आले आहे.

'That' three girls are found | ‘त्या’ तिन्ही मुली सापडल्या

‘त्या’ तिन्ही मुली सापडल्या

प्रकरण वस्तीगृहाचे : अड्याळ पोलिसांची कारवाई
अड्याळ : दवाखान्यात जाण्यासाठी वैशाली वसतिगृहातून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींना २४ तासाच्या आता शोधण्यात अड्याळ पोलिसांना यश आले आहे.
वैशाली वसतिगृह परिसरात एक विहीर आहे. या विहिरीत या तिन्ही मुली उत्सुकतेपोटी उतरल्या होत्या. याबाबत तिन्ही मुलींसह सर्व मुलींना असे काम करण्याचे नाही म्हणून सांगितले होते. ही माहिती मुलींच्या आईवडीलांना माहिती झाली तर पुन्हा मार बसेल या भितीने तिन्ही मुलींनी अधीक्षीकेला आम्ही दवाखान्यातून येतो म्हणून वसतिगृहातून बाहेर पडल्या होत्या.
तिन्ही मुली प्रथम पहेला व त्यानंतर भंडारा येथून नागपूरला गेल्या होत्या. अधीक्षीकेच्या तक्रारीनंतर पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा कामाला लागली. या तिन्ही मुलींना नागपूर नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. या तिन्ही मुलींचा शोध लागताच पोलीस तसेच पालकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे व त्यांच्या चमूने केला. (वार्ताहर)

Web Title: 'That' three girls are found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.