वरठी खून प्रकरणात तीन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST2021-05-06T04:37:53+5:302021-05-06T04:37:53+5:30

वैभव सुरेश नगरारे (२४), रा. नेहरू वॉर्ड याचा सोमवारी रात्री धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी जयश ...

Three days police custody in Varathi murder case | वरठी खून प्रकरणात तीन दिवसांची पोलीस कोठडी

वरठी खून प्रकरणात तीन दिवसांची पोलीस कोठडी

वैभव सुरेश नगरारे (२४), रा. नेहरू वॉर्ड याचा सोमवारी रात्री धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी जयश शंकरनाथ शिंदे, जोशेल शंकरनाथ शिंदे, बब्बू गफार शेख तिघेही रा.वरठी यांना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद केले होते. दरम्यान, या तिघांनाही मोहाडी येथील न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तसेच या तिघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

प्रभारी पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी जोशेल व जयेश यांच्या राहत्या घरातून कूलरच्या टाकीत लपवून ठेवलेला चाकू जप्त केला होता. आरोपींना जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पथकाने कामगिरी केली होती.

Web Title: Three days police custody in Varathi murder case