शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

भंडारा शहरात कोविडच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भंडारा शहरात ७५७ कोरोना बाधीतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी भंडारा शहरातील रुग्णसंख्या पाहता कठोर पावले उचलावी लागतील, असे सुतोवाच सोमवारी पालिका प्रशासनाने केले होते. ‘लोकमत’ने याबाबत मंगळवारी वृत्त प्रकाशित केले.

ठळक मुद्देवाढत्या रुग्णसंख्येवर घेतला निर्णय : मंगळवारी ११० व्यक्ती पॉझिटिव्ह, ५९ व्यक्तींना रूग्णालयातून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंगणीक सातत्याने वाढत आहे. त्यातच भंडारा शहर रुग्णसंख्येच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरल्यानंतर पालिका प्रशासनाने भंडारा शहरात तीन दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. ११ ते १३ सप्टेंबर या दरम्यान हा कर्फ्यू राहणार असून फक्त दवाखाने, औषधी दुकाने व दूध डेअरी सुरु राहणार आहे.
भंडारा शहरात कोविडच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भंडारा शहरात ७५७ कोरोना बाधीतांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी भंडारा शहरातील रुग्णसंख्या पाहता कठोर पावले उचलावी लागतील, असे सुतोवाच सोमवारी पालिका प्रशासनाने केले होते. ‘लोकमत’ने याबाबत मंगळवारी वृत्त प्रकाशित केले. दरम्यान मंगळवारी नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष दिनेश भुरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, पालिका मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर शहरात ११, १२ व १३ सप्टेंबर रोजी जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग यामुळे कमी होईल अशी आशाही व्यक्त करण्यात आली असून ७२ तासांचा हा जनता कर्फ्यूचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहनही पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ही प्रतिष्ठाने राहणार खुली
जनता कर्फ्यू कालावधीत फक्त शहरातील दवाखाने, औषधी दुकाने व दुग्ध डेअरी सुरु राहणार आहेत. वृत्तपत्रांचे वाटपही सुरू राहणार. सकाळी ९ वाजतापर्यंत बाहेर गावाहून येणारे दुग्ध विक्रेते दुधाचे वितरण करू शकतील. १४ सप्टेंबर पासून बाजारपेठा नियमानुसार विहित वेळेत सुरु राहणार आहेत. शहरातील मद्य विक्रीची दुकाने जनता कर्फ्यू कालावधीत बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात
मंगळवारी ११० कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या अहवालाच्या ग्राफ वर नजर घातल्यास सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आहेत. मंगळवारी आढळलेल्या ११० रुग्णांपैकी भंडारा तालुका ६९, साकोली ४, लाखांदूर १, तुमसर व मोहाडी प्रत्येकी १०, पवनी ४ तर लाखनी तालुक्यात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत १३ हजार ७७३ व्यक्तींचे घशाचे नमुने घेण्यात आले असून त्यापैकी २२१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी ५९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आतापर्यंत ११०४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत १४५३ व्यक्तींना सुटी देण्यात आली असून १६१ व्यक्ती भरती आहेत.

भंडारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ११ ते १३ सप्टेंबर रोजी जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे.
- विनोद जाधव,
मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या