शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

भंडारा शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

भंडारा शहरात कोविडच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भंडारा शहरात ७५७ कोरोना बाधीतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी भंडारा शहरातील रुग्णसंख्या पाहता कठोर पावले उचलावी लागतील, असे सुतोवाच सोमवारी पालिका प्रशासनाने केले होते. ‘लोकमत’ने याबाबत मंगळवारी वृत्त प्रकाशित केले.

ठळक मुद्देवाढत्या रुग्णसंख्येवर घेतला निर्णय : मंगळवारी ११० व्यक्ती पॉझिटिव्ह, ५९ व्यक्तींना रूग्णालयातून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंगणीक सातत्याने वाढत आहे. त्यातच भंडारा शहर रुग्णसंख्येच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरल्यानंतर पालिका प्रशासनाने भंडारा शहरात तीन दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. ११ ते १३ सप्टेंबर या दरम्यान हा कर्फ्यू राहणार असून फक्त दवाखाने, औषधी दुकाने व दूध डेअरी सुरु राहणार आहे.भंडारा शहरात कोविडच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भंडारा शहरात ७५७ कोरोना बाधीतांची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी भंडारा शहरातील रुग्णसंख्या पाहता कठोर पावले उचलावी लागतील, असे सुतोवाच सोमवारी पालिका प्रशासनाने केले होते. ‘लोकमत’ने याबाबत मंगळवारी वृत्त प्रकाशित केले. दरम्यान मंगळवारी नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष दिनेश भुरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, पालिका मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर शहरात ११, १२ व १३ सप्टेंबर रोजी जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग यामुळे कमी होईल अशी आशाही व्यक्त करण्यात आली असून ७२ तासांचा हा जनता कर्फ्यूचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहनही पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.ही प्रतिष्ठाने राहणार खुलीजनता कर्फ्यू कालावधीत फक्त शहरातील दवाखाने, औषधी दुकाने व दुग्ध डेअरी सुरु राहणार आहेत. वृत्तपत्रांचे वाटपही सुरू राहणार. सकाळी ९ वाजतापर्यंत बाहेर गावाहून येणारे दुग्ध विक्रेते दुधाचे वितरण करू शकतील. १४ सप्टेंबर पासून बाजारपेठा नियमानुसार विहित वेळेत सुरु राहणार आहेत. शहरातील मद्य विक्रीची दुकाने जनता कर्फ्यू कालावधीत बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यातमंगळवारी ११० कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या अहवालाच्या ग्राफ वर नजर घातल्यास सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आहेत. मंगळवारी आढळलेल्या ११० रुग्णांपैकी भंडारा तालुका ६९, साकोली ४, लाखांदूर १, तुमसर व मोहाडी प्रत्येकी १०, पवनी ४ तर लाखनी तालुक्यात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत १३ हजार ७७३ व्यक्तींचे घशाचे नमुने घेण्यात आले असून त्यापैकी २२१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी ५९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आतापर्यंत ११०४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत १४५३ व्यक्तींना सुटी देण्यात आली असून १६१ व्यक्ती भरती आहेत.भंडारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ११ ते १३ सप्टेंबर रोजी जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे.- विनोद जाधव,मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या