गाय, म्हशींच्या बाजारात तीन कोटींची उलाढाल

By Admin | Updated: September 4, 2014 23:35 IST2014-09-04T23:35:52+5:302014-09-04T23:35:52+5:30

बाजार गाय, म्हशींचा होता, पण तिथे गाय म्हशींपेक्षा माणसांचीही गर्दी जास्त होती आणि किंमत मात्र गाय, म्हशींची लावली होती. जागोजागी सकाळी ९ वाजतापासून गाय म्हशींचा मेकअप सुरु होता.

Three crores turnover in the market for cow, buffaloes | गाय, म्हशींच्या बाजारात तीन कोटींची उलाढाल

गाय, म्हशींच्या बाजारात तीन कोटींची उलाढाल

कोंढा (कोसरा) : बाजार गाय, म्हशींचा होता, पण तिथे गाय म्हशींपेक्षा माणसांचीही गर्दी जास्त होती आणि किंमत मात्र गाय, म्हशींची लावली होती. जागोजागी सकाळी ९ वाजतापासून गाय म्हशींचा मेकअप सुरु होता. ४० ते ५० हजारांच्या खाली देणार नाही, असे वाक्य बाजारात कोंढा येथे कानावर ऐकू येत होते.
सुमारे ८ हजार लोकसंख्येचे कोंढा गावातील हे चित्र दर बुधवारी येथे गाय, म्हीशंचा बाजार भरतो. गाव लहान असले तरी बाजार मोठा असतो. येथे कोट्यवधी रुपयाची उलाढाल होते. येथे दर बुधवारला शेकडो गाय, म्हशींची विक्री होते. दूरदूरचे लोक, बँक अधिकारी, व्यापारी खरेदी करण्यासाठी येत असतात.बाजारात अक्षरश: जत्रेचे स्वरुप असते. परिसरातील, जिल्ह्यातील, परराज्यातील लोक गाय, म्हशी विक्रीसाठी कोंढा येथे येतात. सकाळी १० ते ११ दरम्यान बाजाराला सुरुवात होते. दुपारी १२ वाजतापासून बाजार गजबजू लागते. तीन वाजेपर्यंत गाय, म्हशींची खरेदी विक्री जोमाने सुरु असते. ग्रा.पं. कोंढ्याच्या जागेत बाजार भरतो. परंतु बाजारात गाय म्हशींच्या खरेदी विक्रीची पावती फाडण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी तर्फे केले जाते. खरेदीदार विक्री रकमेच्या २ टक्के रक्कम भरून पावती मिळते. पण बाजारात अनेक वर्षापासून आवश्यक सुविधा पाणी, साखळदंड, व इतर सामान उपलब्ध करीत नाही अशी खंत अनेक व्यापारीमंडळींनी बोलून दाखविली. शेतकऱ्यांची नोंदणी शुल्क भरून देखील त्यांच्या जनावरांना म्हणजे गाय, म्हशींना अनेक सोय उपलब्ध होत नाही. सप्टेंबर ते फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात या बाजारात मोठी तेजी असते. या कालावधीत बाजाराच्या दिवशी जवळपास १ हजार गाय, म्हशी विक्रीसाठी असतात. त्यापैकी ७०० ते ८०० पर्यंत जनावरांची विक्री, खरेदी होते.
गाय म्हशींचा भाव २० हजारापासून ६० हजारापर्यंत असते. जर्सी गाय, मुर्रा म्हैस यांना तर मोठा भाव मिळते. बुधवारला बाजाराला भेट दिली असता छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातले बँक अधिकारी शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून अनुदान तत्वावर गाय, म्हैस वाटप करण्यासाठी घेण्यासाठी आले होते. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर वर्धा, अमरावती जिल्ह्यातून तर मराठवाडा भागातील व्यापारी, गोपालक खरेदी विक्रीसाठी आलेले दिसले. (वार्ताहर)

Web Title: Three crores turnover in the market for cow, buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.