ऋषिपंचमीला हजारो महिलांनी केले वैनगंगेत पवित्र स्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : ऋषि पंचमीच्या पावन पर्वावर विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी शहरातील वैनगंगा नदी तिरावरिल वैजेश्वर ...

ऋषिपंचमीला हजारो महिलांनी केले वैनगंगेत पवित्र स्नान
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : ऋषि पंचमीच्या पावन पर्वावर विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी शहरातील वैनगंगा नदी तिरावरिल वैजेश्वर घाटावर विदर्भातून आलेल्या हजारो महिलांनी स्नान करुन आपले व्रत सोडले.
भारतीय संस्कृतीत ऋषिमुनीबद्दल प्रचंड आदर आहे. याच ऋषि मुनिबद्दल आपणास आदर निष्ठा भक्ति व्यक्त करने हेच ऋषिपंचमीचे प्रयोजन असल्याचे महिला भाविक सांगतात. गणरायांचे आगमन झाल्यानंतर दुसºया दिवशी ऋषिपंचमीचे व्रत महिलांकडून केले जाते. पूजा केल्यानंतर उपवास सोडण्याकरिता देवतांदूळ, लवकी, दोडके आणि अन्य हिरव्या भाजीचा वापर केला जातो. पवनी शहर हे प्राचीन ऐतिहासिक असून इथे ३५० च्या वर मंदिर आहेत म्हणून हे शहर मंदिराचे शहर म्हणून नावारूपाला आलेले आहे. ऋषिपंचमीला विदर्भातील दूरदूरुन रजोनिव्रृत्त महिला पवित्र स्नान करायला मिळेल त्या वाहनाने पवनीला येतात.
पवित्र स्नानानंतर जवळच वैजेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते.
यावेळी वैजेश्वर मंदिराला आमदार रामचंद्र अवसरे, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, नगराध्यक्ष पूनम काटेखाये, नगर सेविका अनुराधा बुराडे, पूनम हटवार, किशोर पंचभाई यांनी सदिच्छा भेट दिली.
याकरिता वैजेश्वर देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष भास्कर भाजीपाले, सचिव महादेव लीचडे, सहसचिव सुरेश अवसरे, वैनगंगा विद्यालयाचे स्काऊट गाईड चे पथक व पथक प्रमुख अनिल मुंडले, पवन विद्यालयाचे स्काऊट गाईड पथक व पथक प्रमुख राजेश एलशेट्टीवर, नगर परिषद पवनीचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय चे आरोग्य कर्मचारी, वैजेश्वर घाट साफ सफाई करणारे गिरीधर उरकुडकर , तसेच नदीला पुरे असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ढिवर बांधव लक्ष ठेवून होते. शहरात येणाºया असंख्य वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता पोलीस स्टेशन पवणीचे ठाणेदार यशवंत सोलसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.