हजारो महिलांनी केले पवित्र स्रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:14 IST2018-09-14T23:14:13+5:302018-09-14T23:14:31+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारा पवनी हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. कित्येक वर्षांपासून पारंपारिक उत्सव अत्यंत सलोख्याच्या भावनेतून साजरा केला जात आहे. ऋषी पंचमी हा त्यापैकीच एक उत्सव आहे. यात ऋषी पंचमीच्या पावन पर्वावर हजारो महिलांनी वैनगंगा नदीत पवित्र स्रान केले. यावेळी भाविकांचा मेळा होता.

Thousands of women have made sacred arrangements | हजारो महिलांनी केले पवित्र स्रान

हजारो महिलांनी केले पवित्र स्रान

ठळक मुद्देमहत्त्व ऋषिपंचमीचे : वैजेश्वर घाटावर भाविकांचा मेळा

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारा पवनी हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. कित्येक वर्षांपासून पारंपारिक उत्सव अत्यंत सलोख्याच्या भावनेतून साजरा केला जात आहे. ऋषी पंचमी हा त्यापैकीच एक उत्सव आहे. यात ऋषी पंचमीच्या पावन पर्वावर हजारो महिलांनी वैनगंगा नदीत पवित्र स्रान केले. यावेळी भाविकांचा मेळा होता.
ऋषी पंचमीचा व्रत करणाऱ्या महिलांनी पहाटेपासून वैनगंगा नदीच्या वैजेश्वर व ताराबाई घाटावर हजेरी लावली. पवित्र स्नान, पूजा व स्वयंपाक करुन नैवेध ठेवून उपवास सोडून व्रत पूर्ण झाल्याचा समाधान बाळगून घरी परतल्या.
दिवसभर हजारो महिला व्रत पुर्ण करण्यासाठी या पवित्र स्थळी येत असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
यासाठी वैजेश्वर मंदिर पंचकमेटी, नगर पालिका प्रशासन, ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकिय चमू, होमगार्डस पवनी उत्पादक सहकारी संस्था व स्वयंसेवी संस्थानी व्रतस्थ महिलांची गैरसोय टाळण्यासाठी सहकार्य केले.
सदर व्रत रजोनिवृत्ती झालेल्या महिला करीत असतात. त्यासाठी यावर्षी हजारो महिलांनी वैजेश्वर घाटावर स्नान केले.
यानंतर वैजेश्वर मंदिरात महिलांनी पूजा अर्चना करून व्रत पूर्ण केला.

Web Title: Thousands of women have made sacred arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.