कोट्यवधींची नळयोजना तहानलेलीच
By Admin | Updated: February 8, 2015 23:30 IST2015-02-08T23:30:22+5:302015-02-08T23:30:22+5:30
राज्यात भाजपाची सत्ता असताना जीवन प्राधीकरण पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. तालुक्यात पिंपळगाव/को. येथे कोट्यावधीचा निधी खर्च करुन ९ गावांसाठी

कोट्यवधींची नळयोजना तहानलेलीच
लाखांदूर : राज्यात भाजपाची सत्ता असताना जीवन प्राधीकरण पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. तालुक्यात पिंपळगाव/को. येथे कोट्यावधीचा निधी खर्च करुन ९ गावांसाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र निधी खर्च होऊनही पाणीपुरवठा सुरु होऊ शकला नाही. कोट्यवधीची नळयोजना तहानलेली आहे.
स्वच्छ व निरोगी पाणी समाजातील प्रत्येक नागरिकांच्या पिण्यासाठी जिवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. तालुक्यात यासाठी दिघोरी/मोठी व पिंपळगांव/को. या गांवाची निवड करण्यात आली. यासाठी शासनाने कोट्यावधींचा निधी मंजूर केला. दिघोरी येथील नळयोजना पूर्णत्वास येवून लोकांच्या सेवेस उतरली. मात्र, पिंपळगांव/को. येथील भव्य दिव्य नळयोजना निधी खर्च होवूनही कोरडीच आहे. ही नळयोजना बांधकामाला सुरुवात होतानाच अनेक अडथळे आले. वारंवार कंत्राटदार बदलले अभियंत्यांना बांधकामाकडे पाठ फिरवली. त्यामुळे एकूणच बांधकामाला अडथळा आला. मात्र कंत्राटदाराची देयके रखडली नाही. निधी खर्च झाला मात्र, तालूक्यातील ९ गावांना पाणी पुरवठा होवू शकला नाही.
लाखांदूर, मेडघाट, पिंपळगांव, मेंढा, चप्राड, दहेगांव, किन्हाळा, कन्हाळगांव, पूयार या ९ गावांना या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होणार होता. मधल्या १० वर्षापासून या ९ ही गावांना स्वतंत्र नळ योजना मंजूर करवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणी पूरवठा योजनेतून करण्यात आल्याने ही जीवन प्राधिकरण योजना रखडली. मात्र निधीची वाट लागली.
लाखांदूर/पालांदूर या गावाला मात्र कोणत्याच नळयोजनेचे पाणी अद्याप पोहोचले नाही. जिवन प्रादेशिक योजनेंतर्गत जलकुंभ प्लॉट येथे तयार आहे मात्र पाणी अद्याप पोहोचले नाही. या संदर्भात गावकऱ्यांना मुख्य कार्यपालन अधिकारी, खासदार नाना पटोले यांचेकडे तक्रारी करुन पिण्याच्या पाण्याच्या मागोवा धरुन ही नळयोजना सुरु करण्याची मागणी केली. मात्र प्लॉट येथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होवू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)