तहसीलदारांना धमकी देणारे तीन रेती तस्कर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:13 IST2019-02-01T22:13:18+5:302019-02-01T22:13:34+5:30

येथील तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन रेती तस्करांना साकोली पोलिसांनी अटक केली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून तीन टिप्पर जप्त करण्यात आले.

Thousands threatening Tahsildar | तहसीलदारांना धमकी देणारे तीन रेती तस्कर गजाआड

तहसीलदारांना धमकी देणारे तीन रेती तस्कर गजाआड

ठळक मुद्देएकोडीची घटना : शासकीय कामात अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथील तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन रेती तस्करांना साकोली पोलिसांनी अटक केली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून तीन टिप्पर जप्त करण्यात आले.
तहसीलदार अरविंद हिंगे शुक्रवारी सकाळी साकोली तालुक्यातील एकोडी येथे शासकीय कामानिमित्ताने गेले होते. त्यावेळी त्यांनी टिप्पर क्रमांक एमएच ३६ एफ ३४४९ रेतीची वाहतूक करताना दिसली. तहसीलदाराने सदर टिप्परच्या चालकाला रॉयल्टी दाखविण्यास सांगितले. त्यावरून वाद घालत तहसीलदारांच्या शासकीय वाहनासमोर आडवे झाले. शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच शाब्दिक हुज्जत घालून तहसीलदार हिंगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारानंतर तहसीलदार अरविंद हिंगे यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तहसीलदारांच्या तक्रारीवरून राकेश बांते (३३) रा. भिलेवाडा, अतुल रंगारी (२०) रा. नवरगाव, सुनील कुंभारे (२२) रा. कोकणागड यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच तिघांना तात्काळ अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रेवतकर, जमादार मस्के, परशुरामकर करीत आहे.

Web Title: Thousands threatening Tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.