शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर येथे तीन हजार धान पोती पावसात भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:05 IST

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ठेवलेले सुमारे तीन हजार धान पोती पावसात भिजली आहेत. बाजार समिती प्रशासनाने ताडपत्रीची व्यवस्था केल्याने काही अंशी धानपोत्यांना कमी फटका बसला तर दुसरीकडे प्लास्टीक पोत्यांमध्ये असलेले धान पावसात बचावले.

ठळक मुद्देबाजार समितीतील प्रकार : प्लास्टिक पोत्यातील धान बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ठेवलेले सुमारे तीन हजार धान पोती पावसात भिजली आहेत. बाजार समिती प्रशासनाने ताडपत्रीची व्यवस्था केल्याने काही अंशी धानपोत्यांना कमी फटका बसला तर दुसरीकडे प्लास्टीक पोत्यांमध्ये असलेले धान पावसात बचावले. परंतु ओल्या झालेल्या धानाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती विदर्भात प्रसिद्ध आहे. धानाचे कोठार म्हणून तुमसर मोहाडी तालुक्यांची ओळख आहे. धानाची आवक असल्याने बाजार समितीचे आवारही मोठे आहे. सुसज्ज अशी बाजार समिती आहे. परंतु काही ठिकाणी शेड नाही. बाजार समितीत धानाच्या हंगामात प्रचंड आवक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या जागेतच आपले धान पोते ठेवावे लागतात. यंदाही हजारो पोते बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर ठेवली आहेत. त्यातच दोन दिवसापासून पावसाची रिपरीप सुरु आहे.सोमवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री जोरदार बरसला. त्यात धानाची सुमारे तीन हजार पोती ओली झाली. सदर धानाचे पोते व्यापाऱ्यांची असल्याची माहिती आहे. पावसाच्या भीतीने मंगळवारी व्यापाऱ्यांनी धान पोत्यांची उचल केली.मार्केट परिसर धानाच्या पोत्यांनी हाऊसफुल्ल असल्याने पोते कुठे ठेवावे असा प्रश्न आहे. ओला धान भरडाईत विपरीत परिणाम होतो. तांदूळ तुटतो, काळसर पडतो, भाव येत नाही, तांदळाला वास येतो. एकीकडे बाजार समिती शेतकऱ्यांच्या भरवशावर कोट्यवधींचा नफा कमावतात. परंतु धान पोती ठेवण्यासाठी शेड बांधण्याला दुय्यम स्थान देत आहेत. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.देखण्या प्रवेशद्वाराची गरज काय?तुमसर बाजार समिती देखणे प्रवेशद्वार बांधण्याच्या तयारीत आहेत. शेतकºयांच्या बाजार समितीला देखण्या प्रवेशद्वाराची गरज काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. प्रवेशद्वारावर होणारा खर्च बाजार समितीचा आहे की, अन्य निधीतून केला जात आहे हा संशोधनाचा विषय आहे. बाजार समित्या सध्या आर्थिक संकटात आहे. परंतु येथे आर्थिक संकट दिसत नाही.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस