६४ प्रवाशांकडून २८ हजारांचा दंड वसूल

By Admin | Updated: November 29, 2014 00:45 IST2014-11-29T00:45:25+5:302014-11-29T00:45:25+5:30

नागपूर येथील रेल्वेच्या भरारी पथकाने ६४ जणांकडून २८ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई शुक्रवारी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दुपारी १२ ते ३ पर्यंत करण्यात आली.

Thousands of passengers have been fined Rs | ६४ प्रवाशांकडून २८ हजारांचा दंड वसूल

६४ प्रवाशांकडून २८ हजारांचा दंड वसूल

तुमसर : नागपूर येथील रेल्वेच्या भरारी पथकाने ६४ जणांकडून २८ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई शुक्रवारी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दुपारी १२ ते ३ पर्यंत करण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वेस्थानकावर कुठेही वाहने पार्किंग करणाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे.
नागपूर येथील रेल्वे न्यायाधीश एस. एस. सहस्त्रबुद्धे, ठाणे प्रभारी माणिकचंद, तुमसर रोड रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक के. पी. टेंभुर्णीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
६४ जणांना विविध कारणास्तव कारवाईला सामोरे जावे लागले. यात रेल्वे ट्रॅक ओलांडनारे १८, अपंग प्रवाशी व महिला बडब्यातून प्रवास करणारे प्रत्येकी ९, नो-पार्किंग झोनमध्ये दुचाकी उभे करणारे १५, टीआरसी अंतर्गत ६ जणांकडून दंड वसूल केला. यात न्यायालयासमोर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बसण्याच्या दंडाचाही समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
नो-पोर्किंग झोनचा गुंता
तुमसर रोड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रशासनाने नो पार्किंग झोन तयार केला. पार्किंग झोन पथकाच्या अलिकडे की पलिकडे जागा आरक्षित आहे याचा गुंता आहे. फलकाच्या पलिकडे मोठी जागा मोकळी आहे. टाईल्सवरील जागा रिकामी आहे. पार्किंग फलकासमोर जागी मोकळी आहे. तिथे रेल्वे प्रवाशी दुचाकी वाहने उभी करतात. १० ते १५ मिनिटात कामे आटोपून ते परत होतात. रेल्वेने हा फलक रेल्वेस्थानक परिसरात प्रवेश करतानाच्या स्थळी लावण्याची गरज आहे. वारंवार येथे दंड भरणाऱ्या प्रवाशांमध्ये असंतोष आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या प्रवाशांना या कारवाईचा आज फटका बसला. येथे फुटवेब्रीज रेल्वेने अजुनपर्यंत पुर्ण केला नाही. त्याचाही फटका नागरिकांना बसत आहे.

Web Title: Thousands of passengers have been fined Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.