पाणी असूनही तहानलेले ‘गणेशपूर’

By Admin | Updated: June 12, 2015 01:24 IST2015-06-12T01:24:01+5:302015-06-12T01:24:01+5:30

भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील नागरिक पाणी टंचाईला सामोरे जात आहे. पाणी असूनही गाव तहानलेले

Thousands of 'Ganeshapur' | पाणी असूनही तहानलेले ‘गणेशपूर’

पाणी असूनही तहानलेले ‘गणेशपूर’

ग्रामपंचायतीची उदासीनता : योजनेच्या नावाखाली अनेकांनी धुतले वाहत्या गंगेत हात !
भंडारा : भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील नागरिक पाणी टंचाईला सामोरे जात आहे. पाणी असूनही गाव तहानलेले असा युक्तीवाद या गावाला तंतोतंत लागू होत आहे.
२००७ मध्ये वैनगंगा नदीवर कोरंभी गावात गणेशपूर गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत गणेशपूरमार्फत ही योजना सुरु झाली. वैनगंगेला भरपूर पाणी असूनही गावाला मात्र काळेकुट्ट प्रदूषित पाण्याचा पिण्यासाठी मागील ८-१० वर्षापासून नळाद्वारे पुरवठा केला जातो. पण ही योजना अंमलात आणताना भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे जलशुद्धकरणाचे संयंत्रच बसू शकले नाही. त्यामुळे सरळ प्रदूषित पेयजलाचा पुरवठा गणेशपूर गावाला केला जातो. या संबंधात अनेक ग्रामसभांमध्ये लोकांनी ओरड केली. पण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंतच्या कालखंडात कधीही गावाला शुद्ध जलपुरवठा व्हावा म्हणून तसदी घेतली नाही. अनेकदा शुद्ध जलपुरवठा व्हावा या दृष्टीने जिल्हाधिकारी व कार्यपालन अधिकारी यांच्याकडे लिखीत तक्रारीसुद्धा केल्या. पण या अधिकाऱ्यांनी सुद्धा या तक्रारीची दखल घेतली नाही. जनतेनी आपल्या तक्रारी शुद्ध जलपुरवठा केला जावा या संबंधात जनतेचे प्रतिनिधी आमदार व खासदारांना वारंवार करण्यात आली. पण त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. २०१५ च्या मे महिन्यात ग्रामसभेत नागरिकांनी आवाज उठवला. त्यावेळेस विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या संबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे असे सांगून सुटका केली. १ मे २०१५ च्या ग्रामसभेत गावासाठी बोअरवेलची व्यवस्था करून गावाला शुद्ध जल पुरवठा करू या दृष्टीने टेंडरिंगची प्रक्रिया करण्यात आली. उन्हाळ्यात गावातील विहिरी कोरड्या पडल्या असताना प्रदूषित जलपुरवठा सुरुच आहे. पाणी ऐवढे प्रदूषित आहे की जनावरे सुद्धा त्या पाण्याला पिऊ शकत नाही. प्रदूषित पाण्यामुळे मागील वर्षी २०१४ मध्ये पावसाळ्यात ५०-६० नागरिकांचे आरोग्य बिघडले. समस्या असूनसुद्धा ग्रामपंचायत पदाधिकारी, जनतेचे प्रतिनिधी, आमदार व खासदार व जिल्हा परिषद अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. वैनगंगेत नागनदीचे प्रदूषित पाणी सोडल्यामुळे पवित्र गंगा अपवित्र व प्रदूषित झाली आहे व नागरिकांना शुद्ध पाण्यापासून जीवन समजले जाते कोणाचेही नाही. कृपया वर्तमानपत्रातील या बातमीमुळे वरिष्ठ मंडळी वा अधिकारी जातीने लक्ष देवून प्रदूषित जलपुरवठा व होणारे गंभीर आरोग्य विषयक समस्यातून गणेशपूरवासीयांची सुटका करतील व शुद्ध जलपुरवठा करून केला जाईल या दृष्टीने उपाययोजना करतील अशी गणेशपूर येथील नागरिकांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of 'Ganeshapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.