साडेपाच कोटीचे कृषी पंप वीज देयक थकीत
By Admin | Updated: February 25, 2016 00:25 IST2016-02-25T00:25:46+5:302016-02-25T00:25:46+5:30
घरगुती वीज बिलासह ग्राम पाणी पुरवठा योजनेच्या वीज बिलाची सक्तीने वसुली होत असताना राजकीय नेत्यांच्या ...

साडेपाच कोटीचे कृषी पंप वीज देयक थकीत
पदाधिकाऱ्यांची आडकाठी : घरगुती विजेसह पाणीपुरवठा योजनेची सक्तीची वसुली
लाखांदूर : घरगुती वीज बिलासह ग्राम पाणी पुरवठा योजनेच्या वीज बिलाची सक्तीने वसुली होत असताना राजकीय नेत्यांच्या आडकाठीमुळे लाखांदूर तालुक्यात तब्बल साडेपाच कोटी रुपयाचे कृषी पंप वीज बिल थकीत असल्याचे उघडकीस आले आहे.
धान उत्पादनात अग्रेसर व सिंचन सुविधायुक्त लाखांदूर तालुक्यात जवळपास साडेपाच हजार कृषी पंप धारक शेतकरी आहेत. खरीप, रबी व उन्हाळी धानपिकाचे या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील घेतले जाते. कृषी पंपाचा वापर करून या सर्व हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेताना मात्र तब्बल साडेपाच कोटी रुपयाचे वीज बिल थकीत असल्याचे उघडकीस आले आहे.
घरगुती वीज बिल वसुली करताना महिन्यागत वीज खंडीत करण्याच्या कारवाईने जनसामान्यात भीती असतानाच अनेक गावातील पाणीपुरवठा योजनेचे वीज बिलाचा विहीत मुदतीत भरणा न झाल्यास चक्क पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत झाल्याची माहिती आहे. मात्र शेतकऱ्यांचा कैवार घेत राजकीय नेत्यांच्या आडकाठीमुळे तालुक्यातील सुमारे साडेपाच हजार कृषीपंप धारकाकडे तब्बल साडेपाच कोटीचे वीज बिल थकीत असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, अपुऱ्या पावसामुळे वीज निर्मिती केंद्रात वीज उत्पादन होताना अनेक अडचणी निर्माण होत असताना देखील नक्षल प्रभावित लाखांदूर तालुक्यात लोडशेडींगचा फटका बसणार नसल्याची माहिती देण्यात आली. व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना मुबलक वीज उपलब्ध करून देणाऱ्या शासनाकडून मात्र कृषी पंपधारकांकडून वीज बिल वसुली अंतर्गत कारवाई केली असता राजकीय नेत्यांकडून आडकाठी केली जात असल्याने वीज वितरण कंपनीमार्फत पुरेशी कारवाई करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याची चर्चा आहे.
एकीकडे कृषी पंपाद्वारे सुामर पाण्याचा उपसा होताना व विविध पिकांचे उत्पादन घेताना जलसंकटाचे भयाण संकट दृष्टीपथात येत असले तरी सर्वसामान्य नागरिकांना पाणीपुरवठा करणारी योजना व घरगुती वीज खंडीत करताना कोण्या राजकारण्यांनी दखल घेतली नाही. मात्र शेतकऱ्यांचा कैवार घेत राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे लाखांदूर तालुक्यात जवळपास साडेपाच कोटी रुपयाचे कृषी पंप वीज बिल थकीत ठरले आहेत. (तालुका प्रतिनिधी)