'त्या' दुर्मिळ प्राण्याला होते दोनच पाय
By Admin | Updated: July 9, 2014 23:18 IST2014-07-09T23:18:37+5:302014-07-09T23:18:37+5:30
तुमसर-गोंदिया राज्य महामार्गाशेजारी मृत पडलेला तो पशू खवल्या मांजर नव्हता तर दुसराच दुर्मीळ प्राणी होता, अशी माहिती पुढे येत आहे. आज दिवसभर क्षेत्र सहायक तथा इतर कर्मचाऱ्यांनी त्याचे धड शोधले

'त्या' दुर्मिळ प्राण्याला होते दोनच पाय
तुमसर : तुमसर-गोंदिया राज्य महामार्गाशेजारी मृत पडलेला तो पशू खवल्या मांजर नव्हता तर दुसराच दुर्मीळ प्राणी होता, अशी माहिती पुढे येत आहे. आज दिवसभर क्षेत्र सहायक तथा इतर कर्मचाऱ्यांनी त्याचे धड शोधले परंतु त्याचा शोध लागला नाही.
माडगी देव्हाडी शिवारात दि.८ रोजी सकाळी ७ वाजता मुंडके कपलेला एक पशु रक्ताच्या थारोड्यात महामार्गाशेजारी तडफडत होता. त्याला मुंडके नव्हते केवळ धड तेवढे होते. रक्ताच्या थारोड्यात तो दोन मागील पाच उचलायचा व त्याच्या अंगावरील खवले ताठ व्हायचे क्षणात खवले सपाट व्हायचे व क्षणात खवले मोठे व्हायचे. सुमारे १५ ते २० मिनिटे तो तडफडत होता. शेवटी त्याची प्राणज्योत मालविली. क्षेत्र सहायक व इतर कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला, परंतु धड पोत्यात भरून नेणाऱ्या दोन इसमाचा शोध शेवटपर्यंत लागला नाही.
या अपघातानंतर वनविभागाचे कर्मचारी दि.८ ला सकाळी ९.३० नंतर घटनास्थळी गेले होते, अशी माहिती आहे. परंतु धड नेणाऱ्यांचा त्यांनी शोध घेतला नव्हता. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांना आज जाग आली. वनपरिक्षेत्राधिकारी एस.यु. मडावी यांना विचारले असता हा प्राणी खवल्या मांजर असल्याचे त्यांनी सांगितले, खवल्या मांजर इतर सस्तन प्राण्यांना चार पाय असतात त्याला केवळ दोनच पाय होते, असे सांगताच प्रत्यक्षात तो प्राणी पाहिल्यावरच निश्चित सांगता येईल, अशी प्रतिक्रिया दिली. (तालुका प्रतिनिधी)