'त्या' कर्मचाऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

By Admin | Updated: January 10, 2015 22:49 IST2015-01-10T22:49:04+5:302015-01-10T22:49:04+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी येथे मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या खर्चाची चौकशी करून अहवाल देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले हाते, परंतु १५ दिवस

'Those' employees' fasting hunger strike | 'त्या' कर्मचाऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

'त्या' कर्मचाऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

तुमसर : प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी येथे मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या खर्चाची चौकशी करून अहवाल देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले हाते, परंतु १५ दिवस लोटल्यानंतरही त्यांनी अहवाल दिला नाही. याविरोधात जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा उपसरपंच तथा ग्रामस्थांनी दिला आहे.
देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी स्टेशनटोलीचे उपसरपंच श्याम नागपुरे, राजेश सेलोकर, बाळा पेंटर, पिंटू सिंह सोबत ग्रामस्थ दिनांक १७ डिसेंबरपासून प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषणाला बसले होते. दि. १८ डिसेंबरला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी देव्हाडी येथे उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्त्यांना मानवविकास कार्यक्रमा अंतर्गत झालेल्या खर्चाची चौकशी करून १५ दिवसात अहवाल देण्याचे मान्य केले. परंतु १५ दिवस लोटल्यावरही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अहवाल दिला नाही.
यासंदर्भात दिनांक ६ जानेवारीला उपसरपंच श्याम नागपुरे, सामाजिक कार्यकर्ता पिंटू सिंह यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'Those' employees' fasting hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.