‘त्या’ दोन आरोपीकडून १० लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:28 IST2018-03-03T22:28:39+5:302018-03-03T22:28:39+5:30

सराफा व्यापाऱ्याला रस्त्यात लुटणाऱ्या दोन आरोपींकडून मोहाडी पोलिसांनी १० लाख ३१ हजार ५०० रूपयांच्या दागिन्यांसह एक दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त केले.

'Those' accused seized 10 lakh worth of money | ‘त्या’ दोन आरोपीकडून १० लाखांचा मुद्देमाल जप्त

‘त्या’ दोन आरोपीकडून १० लाखांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देदोन वाहन घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमत
मोहाडी : सराफा व्यापाऱ्याला रस्त्यात लुटणाऱ्या दोन आरोपींकडून मोहाडी पोलिसांनी १० लाख ३१ हजार ५०० रूपयांच्या दागिन्यांसह एक दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त केले. आरोपींना १७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोहाडी येथील जगदंबा ज्वेलर्सचे संचालक घनश्याम फुंडे यांना तुमसर राज्य मार्गावरील खरबी शिवारात अरूण पाटील (२८), व चंद्रशेखर निपाने (३२) दोन्ही रा. मोहाडी यांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडून सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवून पसार झाले. या फुंडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपींना रायपूर येथून अटक केली. त्यांच्याजवळून ३२ तोळे सोन्याचे व ६५ तोळे चांदीचे दागिने किंमत १० लाख ३१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच घटनेतील दुचाकी व सोने विक्रीसाठी वापरलेले चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केली आहे. चारचाकी वाहन हुसेन पिरमंहमद शेख यांच्या मालकीची असून आरोपींनी ५०० रूपये दरदिवसाच्या भाडेतत्वावर नेली होती. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम, जगन्नाथ गिरीपुंजे, मिथुन चांदेवार, सागर भांडे करीत आहे.

Web Title: 'Those' accused seized 10 lakh worth of money