तिसऱ्या दिवशीही दरोडेखोर मोकाटच

By Admin | Updated: January 10, 2016 00:41 IST2016-01-10T00:41:53+5:302016-01-10T00:41:53+5:30

ठाणा पेट्रोलपंप येथील दर्शनलाल मलहोत्रा यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडूनही पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

On the third day, a robber fired | तिसऱ्या दिवशीही दरोडेखोर मोकाटच

तिसऱ्या दिवशीही दरोडेखोर मोकाटच


रेखाचित्र जारी होणार : पोलिसांना अपयश
भंडारा : ठाणा पेट्रोलपंप येथील दर्शनलाल मलहोत्रा यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडूनही पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. दरोडेखोरांचे रेखाचित्र बनविणे सुरू असून दरोडेखोर तोंडावर कापड बांधून असल्यामुळे रेखाचित्र काढण्यासाठी अडचणी येत आहेत.
आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पथक विविध दिशेला रवाना करण्यात आले आहे. परंतु या पथकांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी दर्शनलाल मलहोत्रा त्यांची पत्नी कांचन, मुलगी नेहा, मुलगा जतीन यांचे बयान घेतले. याशिवाय त्यांच्या घरा शेजाऱ्या लोकांची विचारपुस करून माहिती संकलीत करीत आहे. परंतु पोलिसांना अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही.
घटनेचा तपास करणाऱ्या जवाहरनगर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील दुकाने, एटीएम आणि माथनी पथकर नाका येथून सीसीटीव्हीचे फुटेज घेतले आहे. परंतु तिथेही ठोस पुरावा पोलिसांना मिळू शकला नाही. घटनेच्यावेळी काही आरोपी घराबाहेर तर घरात शिरलेल्या आरोपींचे चेहरे कापडाने बांधलेले असल्यामुळे आरोपींचे वर्णन सांगताना अडचणी येत आहेत. परंतु ते तेलुगु भाषिक असल्याचे मलहोत्रा यांनी सांगितले. मलहोत्रा यांच्या घरून पळविलेले चार भ्रमणध्वनी संचही बंद असल्यामुळे लोकेशन मिळण्यात अडचणी येत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: On the third day, a robber fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.