तिसऱ्या दिवशी उघडले बोदरा ग्रामपंचायतीचे कुलूप

By Admin | Updated: January 28, 2015 23:09 IST2015-01-28T23:09:25+5:302015-01-28T23:09:25+5:30

बोदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाला २६ ला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले. प्रकरण चिघळले. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी ग्रामवासीयांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडले. या प्रकरणाची तक्रार

On the third day, the Lodo Gram Panchayat's lockup opened | तिसऱ्या दिवशी उघडले बोदरा ग्रामपंचायतीचे कुलूप

तिसऱ्या दिवशी उघडले बोदरा ग्रामपंचायतीचे कुलूप

साकोली : बोदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाला २६ ला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले. प्रकरण चिघळले. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी ग्रामवासीयांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडले. या प्रकरणाची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे सरपंचासह कमेटीने ही तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली आहे.
सरपंच शांता पुरामकर यांच्या तक्रारीनुसार, प्रकाश पुरामकर, जयेश कापगते, रवी घरडे, महेश राऊत, परमानंद गणवीर, भागवत कापगते, शांताराम शेंडे, अशोक तिरपुडे, सुरेश तिरपुडे, गजानन परशुरामकर, जास्वंद कापगते, नामदेव कोसरे सर्व रा.बोदरा यांनी ग्रामपंचायत कार्यालय बोदरा येथील कार्यालयात ग्रामसभा सुरु असताना ग्रामसभेत धिंगाणा घालून सरपंचांची मानहानी केली. दि. २६ जानेवारीला साडेबारा वाजेदरम्यान ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सचिव गैरहजर असल्यामुळे सभेचे आयोजन सरपंच यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेला उपसरपंच नंदेश्वर मेश्राम, सदस्य अश्वघरा ईलमकार, सारिका मेश्राम, इंदू पुरामकर, बाळा सोळी, शांताराम शेंडे, धम्मदीप तागडे उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष म्हणून सरपंच यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसभेमध्ये ठेवलेल्या विषयावर साधक बाधक चर्चा करून संबंधित विषयाचा निपटारा करण्यात आला. सभा संपताना जयेश कापगते, शांताराम शेंडे, भागवत कापगते, सुरेश तिरपुडे, अशोक तिरपुडे यांनी मागणी बिलासंबंधात मुद्दा उपस्थित करून उत्तर देण्यासाठी सांगितले. तेव्हा सचिव गैरहजर असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. सचिव आल्यावर या प्रश्नाचे उत्तर देतील असे सांगितले. तेव्हा सर्व गैरअर्जदारांनी धिंगाणा करणे सुरु केले. तेव्हा मी सभा संपल्याचे घोषित केले.
यावेळी प्रकाश पुरामकर याने उपसरपंच मेश्राम यांना शिवीगाळ केली व जयेश कापगते व शांताराम शेंडे यांनी सरपंच यांनाही शिवीगाळ करून ग्रामसभेत अपमानीत केले. सर्व गैरअर्जदारांनी एकमेकांशी संगनमत करून द्वेशभावनेने सरपंच व उपसरपंच यांना अपमानीत केले. यानंतर गैरअर्जदारांनी ग्रामपंचायतला जबरान कुलूप ठोकले. त्यामुळे दोषीवर कारवाई करावी अशी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: On the third day, the Lodo Gram Panchayat's lockup opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.