शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मी चोर आहे, तुम्हाला मारून टाकीन, असे म्हणत चोरटा गेला पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 15:53 IST

कोंबडी चोरण्यासाठी आलेल्या चोराने चाकूच्या धाकावर नागरिकांना धमकावले व संधीचा फायदा घेत पळून गेला.

ठळक मुद्देकोंबडीचोर चोरट्याचा पराक्रम; सेंदुरवाफ्यातील थरार हातात चाकू घेवून पकडणाऱ्यांना धमकावले

भंडारा : मी चोर आहे. माझ्या फंदात पडू नका, मी तुम्हाला मारून टाकेन, असे चाकूच्या धाकावर पकडणाऱ्यांना धमकावत चोरट्याने पळ काढला. साकोली नजीकच्या सेंदुरवाफा येथे कोंबडी चोरण्यासाठी आलेल्या चोराचा हा थरार सोमवारी अनेकांनी अनुभवला.

सेंदुरवाफा येथील गजानन बाबा मंदिराजवळ नागनाथ गणपत बोरकर यांचे घर आहे. रविवारी ते पत्नीसोबत बाजारात गेले होते. घरी आले तर एक इसम त्यांच्या घरातील दोन कोंबडे घेवून जाताना दिसला. त्याला कोणाचे कोंबडे आहेत, असे विचारले तेव्हा माझेच कोंबडे  होय, असे उत्तर दिले. मात्र नागनाथच्या पत्नीने ते आपलेच कोंबडे आहे, असे सांगितले. त्याला पकडण्यासाठी नागनाथ धावला. मात्र चोरटा पळू लागला.

नागनाथने चोर चोर असे ओरडल्याने परिसरातील नागरिकही धावून आले. त्याचवेळी चोरट्याने आपल्या हातातील कोंबडे फेकून खिश्यातून एक लहान चाकू काढला. पकडणाऱ्यांना धमकावत मी चोर आहे, माझे नाव राजेश गायकवाड आहे. तुम्हाला मारून टाकीन, असे म्हणत होता. त्याच्या हातातील चाकू पाहून पकडणारे नागरिकही थबकले. याच संधीचा फायदा घेत पळून गेला. नंतर चोरट्याचा शोध घेतला असता कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून राजेश गायकवाड (३३) रा. गडचिरोली याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.कोंबडी चोराची गावात चर्चाकोंबडी चोरण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या या हिम्मतबाज चोरट्याचीच सध्या सेंदुरवाफात चर्चा आहे. घरमालकाच्या सतर्कतेने कोंबडे चोरता आले नाही. मात्र चाकूच्या धाकावर पसार होता आले आहे. कोंबडे गेले मात्र आपण बचावलो, असेच चोरटा म्हणत असावा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी