लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकाला निर्बंध असल्याने ध्वनिक्षेपकावरून प्रचार करताना संबंधितांना वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार, निवडणूक लढवणारे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या शांततेला व स्वास्थ्याला बाधा पोहोचण्याची व रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवली जाण्याची शक्यता असते. अशात निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपक वापरावर काही महत्त्वाचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनाला प्रतिबंध असेल.
निवडणूक प्रचार व प्रक्रियेवर वॉच
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन निवडणूक व प्रक्रियेवर वॉच ठेवून आहे. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रचार करताना काळजी घ्यावी.
पोलिस विभाग दक्ष
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेला कळविणे बंधनकारक राहील. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमलात राहतील. प्रत्येक व्यक्तीसाठी या आदेशाची अंमलबजावणी करणे शक्य नसल्यामुळे हे एकतफीं आदेश ध्वनिक्षेपकावर पोलिस विभागाने जाहीर करून प्रसिद्धी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
Web Summary : Sakoli: Loudspeaker use is restricted before 6 AM and after 10 PM during local elections. Police permission is mandatory, and stationary use is preferred. Authorities monitor compliance to maintain order throughout the election process.
Web Summary : साकोली: स्थानीय चुनावों के दौरान सुबह 6 बजे से पहले और रात 10 बजे के बाद लाउडस्पीकर का उपयोग प्रतिबंधित है। पुलिस की अनुमति अनिवार्य है, और स्थिर उपयोग को प्राथमिकता दी जाती है। चुनाव प्रक्रिया के दौरान व्यवस्था बनाए रखने के लिए अधिकारी अनुपालन की निगरानी करते हैं।