पोलिसांची गस्त कायम : परिसरातही शांततासंजय साठवणे साकोली साकोली तालुक्यातील वडेगाव (भिमलकसा) येथे नऊ नक्षलवादी आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली माहिती मिळताच पोलिसही पोहचले. शोधमोहिम सुरु झाली मात्र सात दिवसानंतरही पोलिसांना या नक्षलवाद्यांचे ठोस पुरावे मिळाले नसल्याने आलेले ते नक्षलवादी होत की केवळ अफवा होती? हा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा ताफा ठिकठिकाणी तैनात आहे.साकोली तालुक्यातील वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्पाच्या पाळीवर तळा पाहण्यासाठी मासेमारांची एक झोपडी आहे. या झोपडीत रात्री दोघेजन तैनात असतात. २३ जुलैच्या मध्यरात्री या झोपडीत तीन महिला व सहा पुरुष असे एकूण नऊ नक्षलवादी आले व त्यांनी जेवन मागीतले अशी माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच भंडारा व साकोली येथून पोलिसांचा मोठा ताफा नक्षलवाद्याच्या शोधासाठी तैनात करण्यात आला. या घटनेला तब्बल सात दिवस लोटले. मात्र पोलिसांना आलेले नक्षलवादी हे खरे होते की खोटे हे आलेले ते नऊ इसम खरोखरच नक्षलवादी होते का? याचाही शोध पोलिसांना लागला नाही.पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हे नक्षलवादी आले होते. तिथे दोघे जण रात्री तलावाची देखरेख करीत होते. नक्षलवादी आल्यानंतर त्यांनी गावातील एका इसमाला बोलावून सांगितले. त्यावरुन झोपडीतील एक इसम त्याला बोलविण्याकरिता गेला. मात्र तो तो रात्री आलाच नाही. त्यामुळे ज्याला बोलाविले होते. त्या इसमाचा नक्षलवाद्याशी काय संबंध? नक्षलवादयांना त्यांचे नाव कसे काय माहित? हाही संशोधनाचा विषय आहे. नक्षलवादी आल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात पोलिसांची गस्त लावण्यात आली व शोधमोहिम सुरु करण्यात आली व ती आताही सुरुच आहे. तसेच गावालगत लोकांच्या भेटी घेणेही सुरु आहे. परिसरात शांतता असुन कुठलेही भितीचे वातावरण नाही.- जगदीश गायकवाड,पोलीस निरीक्षक
‘त्या’ नक्षलवाद्याचे ठोस पुरावे मिळालेच नाही
By admin | Updated: July 30, 2016 00:28 IST