लाखांदूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST2021-01-15T04:29:31+5:302021-01-15T04:29:31+5:30

पशुधन विकास अधिकाऱ्यांचे आवाहन लाखांदूर : राज्यातील काही भागात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या बातम्या येताच सर्वत्र भीती व्यक्त केली ...

There is no outbreak of bird flu in Lakhandur taluka | लाखांदूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नाही

लाखांदूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नाही

पशुधन विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

लाखांदूर : राज्यातील काही भागात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या बातम्या येताच सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, लाखांदूर तालुक्यात सद्यस्थितीत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येत नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन लाखांदूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनकुसरे यांनी केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यात एकूण ३८ कुक्कुटपालन केंद्र आहेत. या केंद्रापैकी जवळपास ८ केंद्र विविध कारणांनी बंद असून उर्वरित ३० केंद्र सुरू आहेत. या केंद्रात जवळपास ५२ हजार ७०० कोंबडे पक्षी असून या पक्ष्यात ब्रायलर व कॉक्रल या प्रजातीचा समावेश असल्याची माहिती आहे. मात्र, गत काही दिवसांपासून या पक्ष्यांना बर्ड फ्लू आजाराचा संसर्ग झाल्याच्या बातम्यांनी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिणामी तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसायिकांसह चिकन विक्रेते व ग्राहकांत भीती निर्माण होवून खरेदी-विक्रीत कमालीची घट झाल्याची माहिती आहे. मात्र, सद्यास्थितीत लाखांदूर तालुक्यात बर्ड फ्लू या आजाराचा या पक्ष्यांवर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले नाही, असे सांगत या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नियमित कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या संपर्कात असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनकुसरे यांनी दिली.

Web Title: There is no outbreak of bird flu in Lakhandur taluka