शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कामात खोटारडेपणा चालणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:32 PM

प्रशासकीय कामात कामचुकारपणा करू नका, सर्वसामान्यांच्या कामाला न्याय द्या, अन्यथा कुणाचीही गय करणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला.

ठळक मुद्देरमेश डोंगरे : लाखांदूर पंचायत समितीत सत्कार सोहळा

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : प्रशासकीय कामात कामचुकारपणा करू नका, सर्वसामान्यांच्या कामाला न्याय द्या, अन्यथा कुणाचीही गय करणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला.लाखांदूर येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष, सभापती, उपसभापती यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सभापती मंगला बगमारे, उपसभापती शिवाजी देशकर, गटविकास अधिकारी डी. एम.देवरे, विस्तार अधिकारी जी.बी.करंजेकर, मेळे यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा सदुपयोग करण्याची ग्वाही देऊन डोंगरे म्हणाले, विकासाच्या बाबतीत पक्षभेद विसरून मी सदैव तत्पर आहे. शेतकºयांप्रती गंभीर असून शासनाच्या कृषीविषयक योजना प्रत्येक तालुक्यात पोहोचून त्याचा लाभ झाला पाहिजे यासाठी प्राधान्यक्रम देणार आहे. कर्मचाºयांनी सर्वसामान्यांची कामे तातडीने करावी, गरिबांचे कामे करण्यातच खरा आनंद असतो त्यामुळे ग्रामसेवकांनी गावात विकासाच्या दिशेने कामे करावी, प्रशासकीय कामात कुणी खोटारडेपणा केला तर त्याला सोडणार नाही. असा ईशाराही त्यांनी दिला. प्रास्ताविक विस्तार अधिकारी अंबादे यांनी तर आभारप्रदर्शन वानखेडे यांनी केले.