देशद्रोहींना माफी नाहीच

By Admin | Updated: February 20, 2016 01:31 IST2016-02-20T01:31:40+5:302016-02-20T01:31:40+5:30

देशद्रोही कार्य करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. त्यांचा नायनाट करण्यासाठी कठोरात कठोर कायदा करण्याची गरज आहे, ...

There is no apology for the countrymen | देशद्रोहींना माफी नाहीच

देशद्रोहींना माफी नाहीच

जनस्वाभिमान अभियानांतर्गत कार्यक्रम : तारिक कुरैशी यांचे प्रतिपादन
भंडारा : देशद्रोही कार्य करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. त्यांचा नायनाट करण्यासाठी कठोरात कठोर कायदा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले.
येथील गांधी चौकात जनस्वाभिमान अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशीवार, डॉ. प्रकाश मालगावे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी काँग्रेसपक्ष नक्षलवादी व आतंकवादीच्या माध्यमातून राजकारणासाठी उपयोग करीत आहे. हे कार्य शोभनिय नाही. याचा विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी देशद्रोहासाठी पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरू असून अनेकांना पकडण्यात आले आहे. या कारवाईचा उपस्थितांनी समर्थन केले आहे. याप्रसंगी डॉ. युवराज जमईवार, रामकुमार गजभिये, भरत खंडाईत, बोळणे गुरूजी, बाबु ठवकर, विजय जयस्वाल, चंद्रशेखर रोकडे, रमेश खेडीकर, पद्माकर बावनकर, आबिद सिद्धीकी, नरेंद्र वंजारी, प्रशांत खोब्रागडे, सुनिल मेंढे, विकास मदनकर, अरुण भेदे, प्रमोद धार्मिक, संजय मते, मयुर बिसेन, अलिम खान, इरशाद, कलीम खान, आशिष मोहबे, शितल तिवारी, प्रकाश पांडे, रामप्रकाश धुत, नितीन मलेवार, डॉ. गोविंद कोडवानी, दिनकर गिरडकर, मुन्ना फुंडे, शेषराव वंजारी, एकनाथ बावनकर, विलास गोबाडे, सुभाष धांडे, अ‍ॅड. विनोद भोले यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी देशहितासाठी देशातील नागरिकांनी देशद्रोह करणऱ्यांवर धडा शिकविण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे.
देशात आतंकवाद पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांसह देशातील नागरिकांनी पुढाकार घेवून देशप्रेमाची भावना जोपासणे आवश्यक आहे. संचालन नगरसेवक सुर्यकांत ईलमे यांनी केले. आज सकाळपासून गांधी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातून कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले होते. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: There is no apology for the countrymen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.