साकोली नगरपरिषदेसाठी ४९ कोटीचा गृहत आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:41 IST2018-03-26T23:41:51+5:302018-03-26T23:41:51+5:30
शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी, वनजमिनीचे पट्टे, मजुरांना विविध योजना, सिंचनाची सोय अशा विविध योजना भाजप सरकारनी यशस्वी करून दाखविल्या व पुढेही होत राहतील.

साकोली नगरपरिषदेसाठी ४९ कोटीचा गृहत आराखडा तयार
आॅनलाईन लोकमत
साकोली : शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी, वनजमिनीचे पट्टे, मजुरांना विविध योजना, सिंचनाची सोय अशा विविध योजना भाजप सरकारनी यशस्वी करून दाखविल्या व पुढेही होत राहतील. काम करतानी फक्त समाजकारण करायचे एवढाच उद्देश पुढे ठेऊन काम करीत आहे. साकोली नगरपरिषदेकरिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही गावांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.
भाजप सरकारच्या काळात शेतकºयांना कर्जमाफी झाली. ज्या शेतकºयांना या कर्जमाफीचा फायदा मिळाला नसेल त्यांनी पुन्हा कर्ज करू शकतात. जलस्तराच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सिंचनाची सोय होत आहे. साकोली तालुक्यातील कुंभली येथील निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम पुर्णत्वास आले असून या प्रकल्पाचे पाणी शेतीकरिता मिळणार आहे. तसेच या तालुक्यातील दुसरा प्रकल्प भीमलकसा याही प्रकल्पाचे कामालाही सुरवात झाली असून हाी प्रकल्प लवकरच पुर्णत्वास येणार आहे.
जीवनप्राधीकरण विभागातर्फे साकोली व लाखनी या दोन्ही तालुक्यातील १९ गावाकरिता शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना साकोली येथे कार्यान्वीत करण्यात आली. मात्र सदोष नियोजनाअभावी ही योजना पूर्णपणे निकामी झाली आहे. त्यामुळे साकोली नगरपरिषदेकरिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार असून तशा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ४९ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली असून ही संपूर्ण यंत्रणा तयार होणार आहे.
शासनातर्फे नागरिकांसाठी नवनवीन योजना येत आहे. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहनही बाळा काशीवार यांनी विश्रामगृह साकोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी नगराध्यक्ष धरवंता राऊत, तरूण मल्लाणी, भाजपा महिला अध्यक्ष गीता कापगते उपस्थित होत्या.