पासधारकांच्या माध्यमातून सव्वा दोन कोटी तिजोरीत

By Admin | Updated: October 15, 2014 23:15 IST2014-10-15T23:15:17+5:302014-10-15T23:15:17+5:30

‘लोकवाहिनी’ अशी बिरूदावली मिरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभार्थी लाभ घेत आहेत. भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारातून सप्टेंबर महिन्यात

There are two crore checks through passers | पासधारकांच्या माध्यमातून सव्वा दोन कोटी तिजोरीत

पासधारकांच्या माध्यमातून सव्वा दोन कोटी तिजोरीत

प्रशांत देसाई - भंडारा
‘लोकवाहिनी’ अशी बिरूदावली मिरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभार्थी लाभ घेत आहेत. भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारातून सप्टेंबर महिन्यात ३ लाख ४३,३५० पासधारक प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला आहे. त्यांना पासवर मिळालेल्या सवलतीवर एसटी महामंडळाला २ कोटी २५ लाख ७०,३४० रूपयांचा लाभ शासनाकडून मिळणार असल्याने एसटीच्या तिजोरीत वाढ होणार आहे.
रापमंच्या भंडारा विभागीय कार्यालयांतर्गत भंडारा, पवनी, तुमसर, साकोली, गोंदिया व तिरोडा असे सहा आगार आहेत. या आगारातुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रवाशांना देण्यात येतात. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना प्रवासी पासच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे. एसटीच्या मुख्य सवलतीत लाभ घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात विभागांतर्गत लाभ घेणाऱ्यांमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा समावेश वगळता अन्य प्रकारच्या योजनांचा लाभ अनेकांनी घेताला आहे.
शासनाने शालेय विद्यार्थीनींना इयत्ता ५ ते १० पर्यंतच्या शिक्षणासाठी अहल्याबाई होळकर यांच्या नावाने घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी मोफत पास योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थींनींना १०० टक्के सवलत देण्यात येते. यात ४ हजार ३८४ विद्यार्थींनींना लाभ मिळाला आहे. त्यांच्या मोफत पाससाठी शासनाकडून भंडारा विभागाला एका महिन्यासाठी २७ लाख ३४,६५९ रूपये प्राप्त होणार आहे. विद्यार्थी मासिक पास योजनेत विद्यार्थ्यांना तिकिट दराच्या ३३ टक्के रक्कम द्यावे लागते. उर्वरीत रक्कम शासन देते. यात २१,६०१ विद्यार्थी लाभार्थी आहेत.
बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग सुटीत स्वगावी येण्यासाठी ५० टक्के सवलतीवर पास देण्यात येते. यात १०२ विद्यार्थी लाभार्थी आहेत. परिक्षार्थींना ५० टक्के सवलत देण्यात येते. यात २२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. शैक्षणिक शिबिरांसाठी, आजारी आईवडिलांना भेटण्यासाठी, शैक्षणिक सहल, शैक्षणिक स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक, क्षयरुग्ण, कर्करुग्ण असलेल्या प्रवाशांना तिकिटाच्या ५० टक्के सवलत देण्यात येते. यात मागील महिन्यात शिबिरासाठी १७९ विद्यार्थी, आईवडिलांची भेट घेणाऱ्यांमध्ये २६ विद्यार्थी, सहलीसाठी २७७ विद्यार्थी, ८ क्षयरुग्ण, १०८ कर्करुग्ण लाभार्थ्यांचा समावेश आहे. २ लाख ४४,४३६ ज्येष्ठ नागरिकांना एसटीने प्रवास सवलत दिली आहे. कुष्ठरुग्णांना ७५ टक्के सवलत देण्यात येते. अंधव्यक्तींना ७५ टक्के तर त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याला प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळतो. १,१७३ अंध व्यक्तींना तर १२९ सहकाऱ्याला प्रवासात लाभ देण्यात आला आहे. अपंगांना ७५ टक्के प्रवास सवलत देण्यात येते. असा लाभ ६७,०८६ अपंगांना देण्यात आला आहे. २,२४५ सहकाऱ्यांना ५० टक्के प्रवास लाभ देण्यात आला. २२ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना १०० टक्के प्रवास लाभ देण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कारप्राप्त पासधारकाला १०० टक्के सवलतीचा लाभ प्राप्त झाला आहे. तीन आदीवासी सेवक पुरस्कार प्राप्त लाभार्थी, एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त व्यक्तीला प्रवास लाभ देण्यात आला आहे.
२० दिवसाचे पैसे भरून ३० दिवसाचा प्रवासाचे ७४५ लाभार्थी असून ४५ दिवसाचे पैसे भरून ९० दिवसांचा प्रवास करणारे ४२२ प्रवासी आहेत. कुठून कुठेही प्रवासासाठी १० टक्के सवलतीवर २०० रूपयांचा वार्षिक प्रवास पास देण्यात येतो. यात प्रवाशाला एक लाखाचा विमा देण्यात यतो. या प्रकारात ३८० प्रवाशांना लाभ देण्यात आला आहे. आवडेल तिथे प्रवास योजनेचा १९३ प्रवाशांनी लाभ घेतला.

Web Title: There are two crore checks through passers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.