विद्यापीठ पदव्या देणारे कारखाने नाहीत

By Admin | Updated: September 12, 2016 00:34 IST2016-09-12T00:34:58+5:302016-09-12T00:34:58+5:30

आधुनिक युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून विद्यापीठ हे पदव्या वितरित करण्याचे कारखाने नाही.

There are not university designated factories | विद्यापीठ पदव्या देणारे कारखाने नाहीत

विद्यापीठ पदव्या देणारे कारखाने नाहीत

अनिल हिरेकन : ३५ आदर्श शिक्षकांचा सत्कार
तुमसर : आधुनिक युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून विद्यापीठ हे पदव्या वितरित करण्याचे कारखाने नाही. संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. रोजगारामुख शिक्षण ही काळाची गरज आहे .शिक्षकांनी अंतर्मुख होवून विद्यादान करावे. शिक्षकच राष्ट्रनिर्माता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव अनिल हिरेकन यांनी केले. ते इंदूताई मेमोरियल शिक्षण संस्थतर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विकास समितीचे प्रदेश महासचिव डॉ.सच्चिदानंद फुलेकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी आ.मधुकर कुकडे, भाजप जिल्हाध्यक्ष मो.तारिक कुरैशी, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, जिल्हा भाजप महिला अध्यक्ष कुंदा वैद्य, प्राचार्य एच.के. केळवदे, राजकुमार बालपांडे, डॉ.चेतन मसराम, डॉ.वाय.वाय. सेलोकर, बी.यु. थोटे, डॉ.राहुल भगत, एस.एन. राजाभोज, अनिता सिंदपुरे उपस्थित होते. याप्रसंगी तुमसर शहर व तालुक्यातील ३५ महाविद्यालयीन कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक तथा प्राथमिक आदर्श शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अतिथींनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन तथा आजची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आदी विषयावर व्याख्यान दिले. आयोजक तथा संयोजक डॉ.सच्चिदानंद फुलेकर व ज्येष्ठ नगरसेविका विद्याताई फुलेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला. संचालन व आभार रिनाईते, सुनिता तलमले, प्रा.साखरकर, प्रा.हटवार यांनी केले. याप्रसंगी प्रा.विद्यानंद भगत, डॉ.कोमलचंद साठवणे, डॉ.अरुणा थुल, प्रा.मंडपे, प्रा.निरजेश वर्मा, धांडे, पटले, भोजराज येवले, प्रा.मोहन भोयर, प्रा.नितीन पाटील, प्रा.गणेश चाचिरे, प्रा.डोंगरे, बिसेन, बी.आर. फुलेकर, भोईटे, चोले, बागडे, वंजारी, प्रा.जैतवार, प्रा.लोखंडे, प्रा.हाडगे, विलास वासनिक, भगत, अरविंद गेडाम सह प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: There are not university designated factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.