जिल्ह्यात २३५ शाळाबाह्य मुलेमुली
By Admin | Updated: July 21, 2015 00:39 IST2015-07-21T00:39:14+5:302015-07-21T00:39:14+5:30
बालकाचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत बालकांना प्राप्त हक्काची अंमलबजावणी करण्याचे दृष्टिने ...

जिल्ह्यात २३५ शाळाबाह्य मुलेमुली
शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण : २,८८५ कर्मचाऱ्यांनी केले सर्वेक्षण
भंडारा : बालकाचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत बालकांना प्राप्त हक्काची अंमलबजावणी करण्याचे दृष्टिने जिल्ह्यात दि. ११ जुलै रोजी सकाळी ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य बालकाचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जिल्ह्यात २३५ शाळाबाह्य मुले आढळून आले.
सदर सर्वेक्षण जनगणना, सार्वत्रिक निवडणूक व पल्स पोलिओच्या धर्तीवर पूर्ण करण्यात आले. यासाठी सर्वेक्षण करणारे अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात प्रत्येक गावातील प्रत्येक घरास भेट दिली. यासाठी सार्वजनिक ठिकाण, उदा. बाजार रेल्वेस्थानक ,बसस्थानक, रस्त्यात भिक मागणारी मुले, हॉटेलमधील मुले आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन बालकांचे सर्वेक्षण केले आहे. सदर सर्वेक्षणाकरिता जिल्ह्यात २,८८५ सर्वेक्षण करणारे १४३ झोनल अधिकारी व आठ सनियंत्रण अधिकारी व १४ संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणात जिल्ह्यातील शिक्षण विभाग, सर्वशिक्षा अभियान, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग नगरविकास विभाग, अल्पसंख्यक विकास, आरोग्य विभाग, कामगार विभाग, आदिवासी विकास, पोलिस यंत्रणा या विभागासह सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी शिक्षण संस्था आदींचा सक्रीय सहभाग लाभला होता. (जिल्हा प्रतिनिधी)