तीन क्विंटल लोखंडी सलाखीची चोरी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:06+5:302021-02-05T08:39:06+5:30
घटना स्थळावरून चोरी करून नेत असताना दोन्ही आरोपींना माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूजी ठवकर यांचा नातू साहील देवाजी ठवकर ...

तीन क्विंटल लोखंडी सलाखीची चोरी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
घटना स्थळावरून चोरी करून नेत असताना दोन्ही आरोपींना माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूजी ठवकर यांचा नातू साहील देवाजी ठवकर याने पाहिले. त्यावेळी तो एका बाधी पलीकडे शौचास बसला होता. साहीलने सर्व भानगडी घरच्यांना सांगितल्या. बाबूजी ठवकर यांनी शेतात सुरू असलेल्या बांधकाम स्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना तीन क्विंटल लोखंडी सलाखी चोरीला गेल्याच्या दिसून आल्या. चोरीचा हाल काही अंतरावरील नितीन बागडे यांचे घराशेजारी मिळून आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाबूजी ठवकर यांनी करडी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून उपरोक्त दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ठाणेदार स्वप्नील नेवसे यांचे मार्गदर्शनाखाली पालोरा बिटचे पोलीस हवालदार विजय सलामे, बोंद्रे करीत आहेत. आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे.