पावडर, सौंदर्य क्रीम अन् बिस्कीटची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST2021-01-13T05:32:40+5:302021-01-13T05:32:40+5:30

भंडारा : रुग्णालयासमोर रुग्णांच्या सोयीसाठी विविध वस्तू विक्री पानठेल्यातून चोरट्याने खोबरेल तेल, पावडर, सौंदर्य क्रीम, एवढेच नाही तर सरसो ...

Theft of powder, beauty cream and biscuits | पावडर, सौंदर्य क्रीम अन् बिस्कीटची चोरी

पावडर, सौंदर्य क्रीम अन् बिस्कीटची चोरी

भंडारा : रुग्णालयासमोर रुग्णांच्या सोयीसाठी विविध वस्तू विक्री पानठेल्यातून चोरट्याने खोबरेल तेल, पावडर, सौंदर्य क्रीम, एवढेच नाही तर सरसो तेलाच्या लहान बाॅटल्सही चोरून नेल्याची घटना तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोर घडली.

दिनेश महादेव गोरे (रा. कुंभारे नगर तुमसर) यांचे छोटेखानी जनरल स्टोर्स असलेला पानठेला उपजिल्हा रुग्णालयासमोर आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शनिवारी रात्री पानठेला बंद केला. दुसऱ्या दिवशी उघडण्यासाठी गेले असता कुलूप तुटलेले दिसून आले. दरवाजा उघडला असता दाराशी काचेचे ग्लास व कप फुटलेले दिसले. आत जाऊन पाहतात तर १२ नग खोबरेल तेल बाॅटल, सरसो तेलाच्या लहान बाॅटल्स, १२ नग पावडरचे डबे, डेटाॅल साबण, फेअर अँड लव्हलीचे १२ पाॅकेट, क्रॅकजॅक बिस्कीटचे १२ पाॅकेट आणि १६ पाॅकेट सिगारेट चोरून नेल्या. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Theft of powder, beauty cream and biscuits