शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

तरुण डॉक्टरने स्वतःच्या दवाखान्यातच केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 12:53 IST

Bhandara : केबिनमध्ये पंख्याला घेतला गळफास; भोजापुरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तालुक्यातील भोजापूर येथे एका तरुण डॉक्टरने स्वतःच्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. हर्षल पन्नालाल शेंडे (२९) असे या डॉक्टरचे नाव असून, नंदनवन आयुष क्लिनिक या नावाने तो भोजपूर येथे दवाखाना चालवत होता.

डॉक्टर हर्षल पन्नालाल शेंडे हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील होता. दोन वर्षांचा असताना वडिलाचे छत्र हरवले. त्यामुळे त्याची आई माहेरी भोजापूर येथे आली. त्यामुळे मामा उमेश बांते यांनी सांभाळ केला. आई भोजापूर येथे अंगणवाडी शिक्षिका आहे. त्याचे बीएएमएसपर्यंत शिक्षण झाले होते. गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून गावीच नंदनवन आयुष क्लिनिक नावाने तो दवाखाना चालवीत होता. काही महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयमध्येही वैद्यकीय सेवा देत होता. 

मृत्यूचे कारण गुलदस्त्यात पुण्यावरून प्रशिक्षण आटोपून हर्षद रविवारी गावी आला. त्यानंतर सोमवारी सकाळी दवाखाना उघडला. मात्र, दुपारपर्यंत न आल्याने घरच्यांना दवाखान्यात जाऊन बघितले असता शटर आतून बंद होते. शटर उघडून बघितले असता तर केबिनमध्ये असलेल्या पंख्याला दुपट्ट्याच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

आईचा आधार हरविला डॉ. हर्षद अविवाहित होता. त्याच्या पाठीशी आईशिवाय कुणीही नव्हते. त्याच्या आत्महत्येमुळे आता आईचा एकुलता एक आधार हरविला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा