शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांपासून बोरगाव येथील पाणीपुरवठा योजना ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:38 IST

Bhandara : हर घर नल, हर घर जल या योजनेचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्क सिल्ली : तालुक्यातील बोरगाव बुज. पुनर्वसन येथील गावकऱ्यांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल दोन कोटी एकोणऐंशी लक्ष बावन्न हजार रुपये खर्च करण्यात आले. पाण्याच्या टाकीजवळ सोलर पॅनल लावण्यात आले. घरच्या नळाला पाणी आज येईल, उद्या येईल, अशी गावकऱ्यांना आशा होती. मात्र मागील सात महिन्यांपासून गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना ठप्प असून गावकऱ्यांच्या घरगुती नळाला पाणी आलेच नाही. त्यामुळे हर घर नल, हर घर जल या योजनेचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे बोरगाव येथे चित्र आहे.

नागरिकांना या पाणीपुरवठा योजनेचा कोणताही लाभ झाला नसल्याने नाइलाजास्तव इतरत्र असलेल्या गढूळ पाण्याचे स्रोत शोधावे लागत असून शुद्ध पाण्याविना नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागामधे राहते. ग्रामीण भागातील जनतेस शुद्ध व स्वच्छ आरोग्यदायी पाणीपुरवठा करणे सरकारचा मुख्य उद्देश आहे.  

शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस ४० लीटर पाणी दरदिवशी दरमाणशी आवश्यक आहे. मात्र बोरगाव येथील टाकीतून एक थेंबही पाणी घरगुती नळाला येत नाही. ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी व आरोग्याच्या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून नळाला शुद्ध पाणी द्यायचे नव्हते तर लाखो रुपयांचा चुराडा का केला, अशी गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

लक्ष देणार काय?सात महिन्यांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या पाठपुराव्याची गरज आहे

टॅग्स :bhandara-acभंडाराwater scarcityपाणी टंचाई