शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

असे कसे सरकार? जलसमृद्धीच्या वैभवाला बनवले 'मामा'

By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: November 17, 2022 11:45 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात हजार मामा तलाव

भंडारा : पूर्व विदर्भाचे वैभव ठरलेले माजी मालगुजारी तलाव अर्थात मामा तलाव आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एक एकरापासून ५० एकरापर्यंत क्षेत्र असलेल्या या तलावांचे तळे झाले आहे. काही तलाव तर नामशेष झाले आहेत. देखभाल दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी तर दूरच, चार वर्षांपासून अतिक्रमण काढण्यासाठी साध्या मोजणीसाठीही निधी मिळाला नाही. परिणामी एकट्या भंडारा जिल्ह्यातील १,१५४ मामा तलाव अखेरची घटका मोजत आहे.

गोंड राजाच्या साम्राज्यात पूर्व विदर्भात ३५० वर्षांपूर्वी तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या काळात हे तलाव जमीनदार अर्थात मालगुजारी करणाऱ्यांच्या ताब्यात गेले. त्यानंतर राज्य शासनाच्या अखत्यारीत आले. सध्या या तलावांवर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात हजार मामा तलाव आहेत; मात्र या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात तुडुंब दिसणारे तलाव हिवाळा संपताच कोरडे पडायला लागतात. सिंचनाच्या उपयोगासाठी असलेले तलाव केवळ मत्स्यपालनाच्या उपयोगाचे झाले आहेत.

भंडारा जिल्ह्यात १,१५४ मामा तलाव आहेत. या तलावांची साठवण क्षमता ८७.२४ दशलक्ष घनमीटर असून २४ हजार ९२५ हेक्टर सिंचन क्षमता आहे. २०१८ पासून कोणताही निधी मिळाला नाही. सर्व तलाव गाळाने भरले आहेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मोजणीची गरज आहे. निधीसाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने शासनाला प्रस्ताव पाठविला आहे; मात्र शासनस्तरावर त्याची दखलच झाली नाही.

पाच वर्षांपूर्वी १५० कोटींची तरतूद

दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात २०१६-१७ च्या १५० कोटींची तरतूद केली होती. डिसेंबर २०१७ मध्ये टाटा कन्सल्टन्सीने पुनरुज्जीवनासाठी ३० कोटी रुपये दिले होते; मात्र तेव्हापासून या तलावाकडे कायमचे दुर्लक्ष होत आहे.

आधुनिक पद्धतीने सर्वेक्षणाची गरज

या तलावांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची गरज आहे; मात्र निधीअभावी जिल्हास्तरावरील यंत्रणा हतबल आहे. पूर्व विदर्भाचे वैभव टिकवायचे असल्यास सर्वेक्षण करून अतिक्रमण काढण्याची गरज आहे; मात्र कुणाचेही लक्ष नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पVidarbhaविदर्भzpजिल्हा परिषदagricultureशेतीWaterपाणी