शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांसाठी 'लॉटरी' संपली! आता 'पहिला अर्जदार असेल पहिला लाभार्थी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:21 IST

शेतकऱ्यांना नवा नियम: लॉटरी बंद, अर्ज करणाऱ्यांना थेट लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता लॉटरी पद्धत (लकी ड्रॉ) बंद करण्यात आली आहे. कृषी विभागाने केलेल्या या महत्त्वपूर्ण बदलानुसार, आता 'प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या नव्या धोरणामुळे प्रक्रिया सुलभहोणार असून, पारदर्शकता येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी योजनाशेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत सुधारणा करण्यासाठी शासकीय योजना उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप संच, शेडनेट, पॉलिहाऊस, सिंचन विहीर, कृषी यांत्रिकीकरण यासारख्या योजनांचा समावेश आहे.

अशी होती आधीची लकी ड्रॉ योजनाआतापर्यंत कृषी योजनांच्या लाभासाठी लॉटरी पद्धत वापरली जात होती. शेतकरी मोठ्या संख्येने अर्ज करत असले, तरी फक्त सोडतीत ज्या शेतकऱ्यांचे नाव येईल.

पुन्हा-पुन्हा काढायचे सोडतलॉटरी पद्धतीमध्ये एकाच योजनेसाठी अनेकवेळा सोडत (ड्रॉ) काढावी लागत असे. काहीवेळा पात्र लाभार्थी उपलब्ध नसतात किंवा कागदपत्रे वेळेवर जमा करत नाहीत.

लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करानवीन धोरणानुसार, शेतकऱ्यांना आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे.

'प्रथम येईल त्याला प्राधान्य'या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने आता 'प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य' हे नवीन धोरण लागू केले आहे. यानुसार, जो शेतकरी आधी अर्ज करेल आणि त्याची कागदपत्रे पूर्ण असतील, त्याला योजनेचा लाभ आधी दिला जाईल.

"'लॉटरी पद्धतीत अर्ज करूनही अनेकदा निराशाच येत होती. आता 'प्रथम येईल त्याला प्राधान्य' या धोरणामुळे एकदा अर्ज केल्यावर लाभ मिळेल."- धनंजय वाहाणे, शेतकरी, खुटसावरी 

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना