शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान लाखोंचे झाले, खात्यात आले मात्र पाच हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:57 IST

व्यथा पूरग्रस्तांची: पुनर्वसनाचा तिढाही कायम

विलास खोब्रागडे लोकमत न्यूज नेटवर्क सिल्ली: धरणाचे बॅक वॉटर आणि नदीच्या पुरामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील गावे तसेच भंडारा शहरालगतच्या लोक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने लोकांचे लाखोचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून पूरग्रस्त नागरिकांना केवळ पाच हजारावर बोळवण करण्यात आली. ही मदत म्हणजे पूरग्रस्त नागरिकांची थट्टाच असल्याची लोकांची तीव्र भावना आहे.

जिल्ह्यात ११ व १२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाने नदी, नाले आणि धरणे तुडुंब भरले. धरणातील पाण्याचे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आले. वैनगंगा नदीची २४५.५० मीटर जलसाठा पातळी ओलांडून भंडारा शहरानजीकच्या गणेशपूर व भोजापूर नाल्यालगतच्या सत्कार नगर, नेहरू वॉर्ड, छत्रपती शाहूनगर, महात्मा फुले कॉलनी इत्यादी लोक वसाहतीला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला. दोन ते तीन दिवस पूर पीडित नागरिकांना बेघर व्हावे लागले. 

नकली पूरग्रस्तांना दुहेरी लाभभंडारा शहारातील पूर प्रभावित क्षेत्रातील काही लोकांना घराचा मोबदला दिला आणि ऐच्छिक पुनर्वसन करून घरे संपादित केली. मात्र लोकांनी मोबदला घेऊनही घरे सोडली नाही. अनेकांनी सरकार जमा झालेल्या घरात भाडेकरू ठेवले. काही लोकांनी पुनर्वसनात सरकारने संपादित केलेल्या घरांची रजिस्ट्री होत नाही, संपादित झालेली बुडीत घरे नोटरी करून परस्पर दुसऱ्यांना विकले. ही बुडीत वस्ती जैसे थे आहे.

पाच हजारावर बोळवण पूर ओसरल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी पूर पीडितांना सरकारी मदत देण्यासाठी प्रशासनाने पूरग्रस्त भागातील बुडीत घरांचे पंचनामे केले होते. गत आठवड्यात विधानसभेचे बिगुल वाजण्यापूर्वी काही पूर पीडितांच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झाले. तर काहींच्या खात्यात छदामही आले नाही. त्यामुळे दोन दिवस पुराच्या पाण्यात अन्न, धान्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सामानासह इतरही लाखों रुपयाचे नुकसान झाले. मात्र सरकारने केवळ पाच हजार नुकसान भरपाई दिली. त्यामुळे ही पूरग्रस्त नागरिकांची थट्टाच असल्याचे नागरिक बोलत आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा