क्षुल्लक कारणावरून घराला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 05:00 AM2022-05-22T05:00:00+5:302022-05-22T05:00:16+5:30

घटनेतील तक्रारकर्त्या महिलेने गत १ वर्षापूर्वी घटनेतील आरोपीकडून स्थानिक जैतपूर येथे १ लाख ५० हजार रुपयाला त्याचे राहते घर विकत घेतले होते. तथापि घराची विक्री करूनदेखील तक्रारकर्त्या महिलेच्या परवानगीने घटनेतील आरोपी युवक स्वतःच्या पत्नीसह तात्पुरत्या निवासी सुविधेने विक्री केलेल्या त्या घरात राहत होता. दरम्यान, घटनेच्या दोन दिवसांपूर्वी घर खरेदीकर्त्या तक्रारदार महिला व तात्पुरत्या निवासी सुविधेने राहणाऱ्या युवकात अल्पश: मुद्यावर वाद झाला. या वादाने संतापलेल्या आरोपी युवकाने पुढील दिवशी सकाळच्या सुमारास घराला आग लावली.

The house was set on fire for a trivial reason | क्षुल्लक कारणावरून घराला लावली आग

क्षुल्लक कारणावरून घराला लावली आग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : गत एक वर्षापूर्वी एका महिला नातलगाने खरेदी केलेल्या घरात तात्पुरत्या निवासी सुविधेत राहत असलेल्या अन्य नातलगांनी अल्पश: वादावरून राहत्या घरात आग लावली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने घर विकत घेणाऱ्या अन्य नातलगांचे जवळपास १ लाख ५० हजार रुपयांच्या घराचे नुकसान झाले आहे. 
या घटनेत घर विकत घेणाऱ्या महिला नातलगाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने अन्य नातलगाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील जैतपूर येथे घडली. या घटनेत स्थानिक जैतपूर येथील महानंदा गणपत डोकरे नामक घर खरेदी करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून स्थानिक जैतपूर येथील कोमल प्रकाश खऊल (२५) यांच्याविरोधात दिघोरी/मोठी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, घटनेतील तक्रारकर्त्या महिलेने गत १ वर्षापूर्वी घटनेतील आरोपीकडून स्थानिक जैतपूर येथे १ लाख ५० हजार रुपयाला त्याचे राहते घर विकत घेतले होते. तथापि घराची विक्री करूनदेखील तक्रारकर्त्या महिलेच्या परवानगीने घटनेतील आरोपी युवक स्वतःच्या पत्नीसह तात्पुरत्या निवासी सुविधेने विक्री केलेल्या त्या घरात राहत होता.
दरम्यान, घटनेच्या दोन दिवसांपूर्वी घर खरेदीकर्त्या तक्रारदार महिला व तात्पुरत्या निवासी सुविधेने राहणाऱ्या युवकात अल्पश: मुद्यावर वाद झाला. या वादाने संतापलेल्या आरोपी युवकाने पुढील दिवशी सकाळच्या सुमारास घराला आग लावली. या आगीत आरोपीचे विविध जीवनोपयोगी साहित्यासह एकूण १ लाख ५० हजार रुपयाचे घर जळून खाक झाले आहे. 

अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात
- सकाळच्या सुमारास घराला आग लागली असल्याचे पाहून गावातील नागरिकांनी घराला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता लाखांदूर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन मशीन चालक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घराला लागलेली आग नियंत्रणात आणली. पोलिसांत तक्रार दाखल केल्याने आरोपी युवकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास दिघोरी मोठीचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ग्यानिराम गोबाडे करीत आहेत.

 

Web Title: The house was set on fire for a trivial reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग