लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सृदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम ही बाब अत्यंत गरजेची आहे. त्यादृष्टीने अनेकजण व्यायामावर भर देतात. त्यात मॉर्निंग वॉक ही अत्यंत लाभदायी आहे. प्रदूषणमुक्त असलेल्या भंडारा शहरात मात्र निवांतपणे वॉक करण्यासाठी भरपूर स्थळ असले तरी त्यांचा विकास खुंटलेला आहे. मॉर्निंग वॉक होत असलेले स्थळ ऑक्सिजनवर आहेत. शहरातील खात रोड, मुख्य मार्ग, मिशन ग्राउंड, चैतन्य ग्राउंड व अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉक करायला नागरिक घराबाहेर पडतात.
अपघाताची भीती शहरातील मॉर्निंग स्थळी अपघाताची भीती आहे. ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले, विद्यार्थी सरावासाठी येतात. जमिनीचा उंच सखलपणा व असुविधांमुळे अपघाताची भीती असते. रस्त्यांवरील वाहतूकही मॉर्निंग वॉकला प्रभावित करीत असते.
नागरिकांनी पुढे यावे
- आरोग्याच्या बाबतीत नागरिक सजग झाले आहेत. मॉर्निंग १ वॉकला जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अशावेळी वॉकस्थळी व्यायाम करणाऱ्या सुविधा उभारणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी पुढे यावे.
- अनेकवेळा निधीचा वानवा समोर 3 केली जाते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने हव्या असलेल्या ठिकाणी सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. याठिकाणी वाहनांची वर्दळ अत्यंत अल्प आहे. तिथेच सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे
"अभ्यासानंतर सराव करायचा म्हटल्यास सकाळीच उठावे लागते. मॉर्निंग वॉकला निघतानाच कुठे जावे हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होते. क्रीडा संकुल किंवा अन्य खुल्या मैदानात हव्या तशा सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत. क्रीडा संकुलातील दुरवस्था कित्येक वर्षांपासून कायम आहे." - नितेश चवळे, भंडारा
"दीड वर्षापासून पोलिस भरतीसाठी सराव करीत आहेत. पहाटे ५:३० वाजतापासून मी धावण्याचा सराव करतो. त्यानंतर व्यायाम करतो. सराव करीत असताना रस्त्यावर जड वाहनांची रहदारी असते. ज्या ठिकाणी सराव करायचा आहे तिथे सुविधांचा अभाव आहे. मोकळ्या ठिकाणावर सराव करताना अन्य धोकेही असतात. मोकाट कुत्र्यांचाही शहरात वावर आहे. यावर स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे." - संतोष ठाकरे, भंडारा
"मी वयाची ८० गाठली आहे. अनेक पावसाळे बघितले, मात्र भंडारा शहरातील मॉर्निंग वॉक स्थळांचा विकास अजूनही झालेला नाही. हे बघून मन अधिकच खिन्न होते. प्रदूषणमुक्त भंडारा शहरात यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे." - वासुदेव चकोले, ज्येष्ठ नागरिक, भंडारा