चिनी भाेंगा पिटाळून लावताे शेतात शिरलेल्या वन्यप्राण्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:51+5:30

तुमसर तालुक्यातील पांझरा येथील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तालुक्यात हा प्रयाेग केला. बाजारात ४०० ते ६०० रुपयात हा भाेंगा विकत मिळताे. त्यातून विविध आवाज निघत असल्याने वन्यप्राणी शेताकडे फिरकत नाही. ही युक्ती आता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल्याने अनेक शेतकरी आता हा चिनी भाेंगा खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण केले जात आहे.

The Chinese ravaged the wildlife in the fields | चिनी भाेंगा पिटाळून लावताे शेतात शिरलेल्या वन्यप्राण्यांना

चिनी भाेंगा पिटाळून लावताे शेतात शिरलेल्या वन्यप्राण्यांना

Next

माेहन भाेयर
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : राज्यात भाेंगावरून राजकीय वातावरण तापले असतानाच तुमसर तालुक्यात मात्र चिनी भाेंगा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. शेत शिवारात शिरुन पिकाचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी चिनी भाेंग्याचा प्रयाेग शेतकरी करीत आहे. या भाेंगातून निघणाऱ्या विविध आवाजामुळे वन्यप्राणी शेतात फिरकतही नाही.
जंगलालगत शेतशिवार म्हणजे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. अहाेरात्र रखवाली केल्यानंतरही वन्यप्राणी पीक फस्त करणार हे ठरलेलेच. अनेक उपाय करूनही वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांची सुटकाच हाेत नाही. मात्र आता तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन प्रयाेग केला आहे. चिनी बनावटीचा भाेंगा त्यांच्या मदतीला धावून आला आहे. ॲनिमल रेपिलेंट साऊंड गनच्या माध्यमातून शेतकरी आता निश्चिंत झाले आहे. 
तुमसर तालुक्यातील पांझरा येथील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तालुक्यात हा प्रयाेग केला. बाजारात ४०० ते ६०० रुपयात हा भाेंगा विकत मिळताे. त्यातून विविध आवाज निघत असल्याने वन्यप्राणी शेताकडे फिरकत नाही. ही युक्ती आता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल्याने अनेक शेतकरी आता हा चिनी भाेंगा खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण केले जात आहे.

अन् वाहनधारकांची उडाली त्रेधा 
- पांझराचे शेतकरी सूर्यभान भगत यांनी शेतात भाेंगा सुरू केला. या शेतावरुन भंडारा राज्य मार्ग जाताे. रात्रीच्या सुमारास दुचाकीने शेताजवळून जाताना दुचाकीस्वारांना चित्रविचित्र आवाज ऐकू आला. त्यांची त्रेधा उडाली. गावात जाऊन त्यांनी विचारपूस केली. तेव्हा ताे भाेंगा असल्याचे सांगितले.

आवाज रेकाॅर्ड करुन रात्री केला जाताे भाेंगा सुरु
 या भाेंगातून विविध आवाज काढण्यासाठी आदी रेकाॅर्डिंग करावे लागते. विविध प्राण्यांचे किंवा शेतकरी आवाज रेकाॅर्ड करतात नंतर रात्री किंवा सायंकाळच्या सुमारास भाेंगा सुरू केला जाताे. यातून निघणाऱ्या आवाजामुळे वन्यप्राणी शेताकडे येत नाही.

चिनी बनावटीचा भाेंगा बाजारातून ५०० रुपयात विकत आणला. आवाजामुळे वन्यप्राणी शेताकडे फिरकत नाही. त्यामुळे पिकाचे संरक्षण हाेते. एका चार्जिंगमध्ये चार ते पाच तास चालताे. त्यामुळे रात्री जीव धाेक्यात घालून शेतात जाण्याची गरज नाही. त्यामुळे आमचा वेळ वाचताे.
- सूर्यभान भगत, शेतकरी पांझरा

 

Web Title: The Chinese ravaged the wildlife in the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.