शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात तुडुंब भरलेला बावनथडी प्रकल्प गाठताेय तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येताे. महाराष्ट्रासाठी ९५ दलघमी तर मध्य प्रदेशासाठी १०० दलघमी पाण्याचे विसर्ग करण्याचे धाेरण आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू आहे. या प्रकल्पात सध्या जिवंत साठा १३.९३ दलघमी असून, केवळ ६.४१ टक्केच जलसाठा आहे. धान पिकासाठी हाेणारा पाण्याचा विसर्ग आणि बाष्पीभवनामुळे प्रकल्पातील पाणी कमी हाेत आहे. याचा परिणाम उन्हाळी हंगामाच्या सिंचनावर हाेणार आहे.महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येताे. महाराष्ट्रासाठी ९५ दलघमी तर मध्य प्रदेशासाठी १०० दलघमी पाण्याचे विसर्ग करण्याचे धाेरण आहे. उन्हाळी धानाकरिता १५ मेपर्यंत पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तसेच चांदपूर जलाशयासाठी १० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आता केवळ ६.४१ टक्केच जलसाठा आहे. ही संकटाची चाहूल म्हणावी लागेल.

यंदा प्रकल्प भरला हाेता पूर्ण क्षमतेने- बावनथडी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीचा उगम मध्य प्रदेशात भरपूर पाऊस पडल्याने सिंचन व पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच भीषण तापमानामुळे बाष्पीभवन हाेऊन जलसाठा कमी हाेत आहे.पहिल्यांदाच टेलपर्यंत पाेहाेचले पाणी- बावनथडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी ४२०० हेक्टर नियाेजन करण्यात आले हाेते. यावर्षी प्रथमच टेलपर्यंत पाणी पाेहाेचले. चिखला या गावांना उन्हाळी हंगामासाठी पाणी देण्यात आले.

बावनथडी प्रकल्पातून १५ मेपर्यंत उन्हाळी धानाचा विसर्ग सुरू राहणार आहे. सध्या धरणात जलसाठा कमी असल्याने खरीप हंगामातील धान पऱ्ह्यांना पाणी मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा जपूण वापर केल्यास सिंचनाला याेग्य पाणी मिळेल.- आर. आर. बडाेले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प