तंमुसचा पत्राला बारमालकाचा ठेंगा
By Admin | Updated: November 7, 2016 00:39 IST2016-11-07T00:39:26+5:302016-11-07T00:39:26+5:30
दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिचाळ येथे दोन बियरबार असून दोन्ही बारमधून अवैध मार्गाने ...

तंमुसचा पत्राला बारमालकाचा ठेंगा
पहाटेपासून दारु विक्री : दोन बारचा समावेश
बारव्हा : दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिचाळ येथे दोन बियरबार असून दोन्ही बारमधून अवैध मार्गाने पहाटेपासूनच दारुविक्री सुरु होत असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबद्दल तंटामुक्त समितीला पत्र दिले. या अनुसंगाने तंटामुक्त समितीने सदर बारमालकाला लेखी निवेदन देवून आपली दारुची दुकाने नियमाने सकाळी १० वाजता सुरु करावी आणि रात्री १० वाजता बंद करावी असे पत्राद्वारे कळविण्यात आले. मात्र त्या पत्राची अवहेलना करीत पत्र न स्वीकरता मी मनमर्जीप्रमाणे दुकान सुरु करेन, असे बालेश्वरी बार मालकाने पत्र देणाऱ्या ग्रामपंचायत चपरार यास परत केले. बालेश्वरीबार मधून मागील कित्येक दिवसापासून पहाटेपासून दारुविक्री होत असल्याने गावकऱ्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी माहिती तंमुस अध्यक्षला देण्यात आली. गावकऱ्यांच्या तक्रारीवरुन तंमुस अध्यक्षाने बार मालकाला लेखी निवेदनाद्वारे आपले बियरबार नियमित वेळेत सुरु करा अशी विनंती केली. मात्र हे सगळे ऐकून न घेता सदर बारमालक मनमर्जीप्रमाणे दारुविक्री करीत आहे.
सदर बियरबार हे महात्मा गांधी विद्यालयालगत असल्याने येथील विद्यार्थ्यांना विद्यार्जनात फार मनस्ताप सहन करवा लागत आहे. बियरबार ही भरवस्तीत असल्याने परिसरताील महिलांना आणि बालकांना मद्यपीच्या धिंगाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र याकडे संबंधीत अधिकारी, पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन विभाग दुर्लक्ष करीत आहे. पोलिसांना अवैध दारुविक्री संदर्भात अनेकदा तक्रार देण्यात आली. मात्र पोलीस प्रशसन आणि दारुविक्रेता यात साठगाठ असल्याने कोणतीही कारवाई होत नाही.