जिल्ह्यात १६७९ व्यक्तींची चाचणी, केवळ ९ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:43+5:302021-06-09T04:43:43+5:30
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला हाेता. १८ एप्रिल राेजी १२ हजार ८८७ क्रियाशील रुग्ण हाेते. जिल्ह्यात जवळपास ...

जिल्ह्यात १६७९ व्यक्तींची चाचणी, केवळ ९ पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला हाेता. १८ एप्रिल राेजी १२ हजार ८८७ क्रियाशील रुग्ण हाेते. जिल्ह्यात जवळपास ५० दिवसांनंतर आता केवळ ६४५ क्रियाशील रुग्ण आहेत. क्रियाशील रुग्णांची टक्केवारी केवळ १.०९ आहे. १ जून ते ८ जून दरम्यान काेराेनाचा केवळ एकच मृत्यू असून जिल्ह्यात १.७८ टक्के मृत्युदर आहे.
बाॅक्स
५७ हजार ५२१ व्यक्तींची काेराेनावर मात
जिल्ह्यात ५७ हजार ५२१ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील २४ हजार ९४ माेहाडी ४२१५, तुमसर ६९५९, पवनी ५८७६, लाखनी ६३८८, साकाेली ७१४७ आणि लाखांदूर तालुक्यातील २८४२ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ६४५ क्रियाशील रुग्ण असून त्यात भंडारा तालुक्यात ८२, माेहाडी ३८, तुमसर ३२, पवनी २४, लाखनी ४१, साकाेली ४०३ आणि लाखांदूर तालुक्यातील २५ रुग्णांचा समावेश आहे.