चिखलधोकडा येथे दहा हजारांची देशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:36 IST2021-05-12T04:36:56+5:302021-05-12T04:36:56+5:30
तालुक्यातील चिकलधोकडा येथील वैनगंगा नदी तीरावरून देशी दारूची तस्करी करताना पोलिसांना बघताच दारू सोडून पसार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ...

चिखलधोकडा येथे दहा हजारांची देशी दारू जप्त
तालुक्यातील चिकलधोकडा येथील वैनगंगा नदी तीरावरून देशी दारूची तस्करी करताना पोलिसांना बघताच दारू सोडून पसार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दहा हजारांची देशी दारू यावेळी जप्त केली.
वैनगंगा नदी तीरावरून देशी दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना मंगळवारी मिळाली. त्यावरून लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या नेतृत्वात विलास मातेरे, रवींद्र मडावी, विशाल मुलगिक कारवाई करण्यासाठी चिखलधोकडा येथील नदीघाटावर पोहोचले.
मात्र, पोलिसांना पाहून दोघांनी दारू तेथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी १० हजार २०० रुपयांची दारू जप्त केली. सदर प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.